१२ वर्षानंतर बालिका वधू मधील आनंदी आता दिसते ‘अशी’.. काही फोटोमध्ये ओळखणेही आहे अवघड..

१२ वर्षानंतर बालिका वधू मधील आनंदी आता दिसते ‘अशी’.. काही फोटोमध्ये ओळखणेही आहे अवघड..

छोट्या पडद्यावर काम करणारे बाल कलाकार कालांतरानी काय करतात याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली असते. काही वर्षांपूर्वी शाहरुख खान काजोल यांच्या आलेल्या कुछ कुछ होता या चित्रपटात आलेली एक चिमुरडी आता एक मोठी अभिनेत्री झाली आहे. त्याचप्रमाणे अशा अनेक अभिनेत्री या मोठ्या झालेल्या पाहायला मिळतात.

छोट्या पडद्यावर मराठी मालिका देखील उंच माझा झोका या मालिकेतील तेजश्री वालावलकर हिने चांगली भूमिका केली होती. ती आता चांगलीच मोठी झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी बालकलाकारापासून आपले करियर सुरू केले आहे.

सध्या ती चित्रपटात काम करत नसली तरी राजकारणामध्ये ती सक्रिय आहे. सचिन पिळगावकर यांचे देखील असेच आहे. सचिन यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला जवळपास पन्नास वर्षाचा कालावधी लोटला आहे. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत की, जिने टीव्ही मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.


आज तिचा बदललेला लूक पाहून आपण पहातच राहाल, तर आम्ही आपल्याला 2008 मध्ये आलेल्या बालिकावधू या मालिकेबाबत सांगत आहोत. बालिकावधू या मालिकेत अविका गौर हिने आनंदी नामक बालकलाकाराची भूमिका केली होती. या मालिकेतील राजस्थानी पोशाखात दिसली होती. या मालिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली.

ती देशभरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिने काही वर्ष ब्रेक घेतला. त्यानंतर तिने ससुराल सिमर का या मालिकेत काम केले होते. कमी वय असून देखील तिने विवाहित महिलेची भूमिका साकारली होती. मात्र, त्यानंतर तिला समाज माध्यमांमध्ये चांगले ट्रॉल करण्यात आले होते. याकडे तिने दुर्लक्ष केले. त्यानंतर ती राजकुमार आर्यन या मालिकेत देखील दिसली होती.

सध्या अनेक मालिकामध्ये काम करत आहे. रिअलिटी शोमध्ये देखील तिने खूप काम केले आहे. बॉक्स क्रिकेट लीग सीजन 2 मध्ये देखील तिने काम केले आहे. फियर फॅक्टर खत्रो के खीलाडी सीजन 9 मध्ये देखील ती दिसली आहे. तुझे बदललेले रूप पाहून आपण बघतच राहाल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *