अबब..!.ऐकावे ते नवलच, १२ व्या वर्षी झाले लग्न, पती होता ४० वर्षांचा, २३ वर्षात झाली ४४ मुलांची आई

मुकुनो : या जगामध्ये अजब गजब माणसं असतात.आज आम्ही आपल्याला एका महिलेविषयी माहिती देणार आहोत. या महिलेने तेवीस वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल ४४ मुलाला जन्म दिला आहे. होय ऐकून खरे वाटत नसेल. मात्र, ही सत्य घटना आहे.
युगांडाच्या मुकुनेतील कंपाला गावातील मरियम नबानांजी नावाची एक महिला राहते. या महिलेचे बाराव्या वर्षीच लग्न झाले होते. त्यानंतर २३ वर्षांच्या कालावधीत तिने तब्बल ४४ मुलांना जन्म दिला. तिचे वय बारा तर तिच्या पतीचे वय चाळीस वर्षे होतं.
मरियमचे १९९३ मध्ये १२ वर्षांची असताना ४० वर्षांच्या एका व्यक्तीशी लग्न झाले. आधीच तो विवाहित होता. त्याला अनेक मुले होती. मरियम म्हणते,.मी तेव्हा लहान होते आणि मला काहीही कळत नव्हते. लग्नानंतर वर्षभरामध्ये वयाच्या १३ व्या वर्षी मी पहिल्यांदा आई बनली.
जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यानंतर दोन वर्षांनी तिळे जन्माला घातले. तर त्यानंतर दीड वर्षांनी चार मुलांना जन्म दिला. २३ वर्षांची होईपर्यंत २५ मुलांची आई बनली होती. डिसेंबर २०१६ मध्ये तिने शेवटच्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर शरीर कमकुवत होत असल्याने तिला डॉक्टरांनी आणखी मुले जन्माला न घालण्याचा इशारा दिला. नंतर गर्भाशय काढलं.
मरियमच्या वडिलांना होते ४५ मुले
माझ्यासाठी एवढी मुले काही विशेष बाब नाही. वेगवेगळ्या महिलांपासून माझ्या वडिलांना ४५ मुले होते. ते सर्वही एकाचवेळी पाच, चार आणि तीन अशी जन्मली होती. मरियम सर्व मुलांना स्वतःच सांभाळते. पती तिच्यावर खूप अत्याचार करायचा.
त्यानंतर तो सोडून गेला. ती तेव्हापासून एकटी राहते आणि मुलांना सांभाळते. मोठी मुले तरी पित्याला चेहऱ्याने ओळखतात पण लहान्यांना त्यांचा चेहराही माहिती नसल्याचे मरियम म्हणते. आर्थिक अडचणींमुळे मुलांना सांभाळण्यात अडचण येत असल्याचे ती सांगते.