म्हणून, विवाहित पुरुषांना स्वतःच्या बायको पेक्षा दुसऱ्याची बायको दिसते अधिक सुंदर…

म्हणून, विवाहित पुरुषांना स्वतःच्या बायको पेक्षा दुसऱ्याची बायको दिसते अधिक सुंदर…

तुम्ही हिंदी मधील ही एक म्हण ऐकली असेलच की “शादी एक ऐसा लड्डू है जो खाये वो भी पछताए औंर जो ना खाये वो भी पछताए”. विशेषत: पुरुषांच्या बाबतीत ही द्विधा अवस्था भरपूर प्रमाणात असते. जोपर्यंत पुरुष अविवाहित असतात, तेव्हा त्यांना लग्नाची घाई असते. एकदाच लग्न कधी होईल याची ते आतुरते ने वाट बघत असतात.

पण एकदा त्यांचे लग्न झाले की काही वर्षां नंतर त्यांना याची खंत वाटू लागते की लग्न करण्यास जरा घाईच केलीच. अशा परिस्थितीत आपण बर्‍याच वेळा पाहिले असेल की पुरुषांना आपल्या घरातील स्वतःच्या पत्नी पेक्षा इ*तरांच्या पत्नींमध्ये जास्त रस असतो. अशा परिस्थितीत आपल्या एकच प्रश्न पडतो की हे पुरुष लोक असे का करतात? तर आज आपण हेच रहस्य आज उलगडून बघणार आहोत.

लग्न झालेनंतर पुरुष स्वतःच्या बायकोला चांगल्या प्रकारे ओळखत नसतो, म्हणून लग्नाच्या वेळी आणि काही वर्षांपर्यंत, आपल्या पत्नी बद्दल माहिती करून घेण्यात त्याचा प्रचंड उत्साह असतो. पण एकदा त्याला आपल्या पत्नीची पूर्ण ओळख झाली की त्याला तिच्यात विशेष रस रहात नाही. अशा परिस्थितीत जेव्हा त्याला एखाद्या दुसर्‍या व्यक्तीची बायको दिसते तेव्हा त्याला तीच्या बद्दल जाणून घ्यायचे असते आणि तीच्यात र स घेण्यास सुरुवात करत असतो.

2. तुम्ही ही पण म्हण ऐकलेली असेल की ‘इतरांच्या ताटात तूप नेहमीच जास्त दिसते’ असे म्हणणे तुम्ही कोणाच्या तरी तोंडून ऐकले असेलच. याचा अर्थ असा आहे की तुमचे आयुष्य कितीही चांगले असले तरीही आपल्याला नेहमीच इतरांचे जीवन अधिक आवडते. मग ते घराच्या सुख सुविधा असो किंवा स्वतःची पत्नी.

घरात जर बायको ने थोडीशी खट पट केली तर पुरुषांना लगेच वाटते की ती आपल्या पत्नी पेक्षा दुसरी कोणाची तरी पत्नी खूप चांगली आहे. पण पुरुषांना हे ठाऊक नसते की तीसुद्धा तिच्या पतीसमवेत घरात काहीना काही खट पट करतच असते. इतकेच नाही तर अशीही शक्यता असू शकते की आपल्याला जेव्हा दुसऱ्या पुरुषाची बायको आवडते ते याची पण श्यक्यता असू शकते की दुसऱ्या ला पण आपली बायको आवडू शकते.

3. कधीकधी काही बायका स्वतःच्या पतीला जास्त प्रेम देण्यास सक्षम नसतात किंवा त्यांना जास्त वेळ एकत्र घालवण्या साठी पुरेसा वेळ नसतो. अशा परिस्थि तीत पतीला एकटेपणा जाणवू लागतो आणि प्रेमाच्या शोधात तो इतरांच्या पत्नी मध्ये रस घेतो. ही परिस्थिती पत्नी सोबत जास्त भांडण केलेमुळे देखील उ द्भऊ शकते.

4. जवळजवळ सर्व पुरुषांना अशी सवय असते की ते इतर स्त्रियांना ट्रोल करत राहतात. पुरुष कितीही शरीफ असुध्यात, जर एखादी सुंदर स्त्री त्याच्या समोर आली तर तो तिला मन भरे पर्यंत न्याहळत असतो. हे एकमेव कारण आहे की जर समोरच्या व्यक्तीची पत्नी आनंदी असेल तर केवळ आपला नवराच नाही तर प्रत्येकाचा नवरा तिच्यावर नेत्र सुख घेत असतो आणि तिच्यात रस दाखवत असतो.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *