‘कभी खुशी कभी गम’ मधील शाहरुख-काजोलचा मुलगा आता झालाय मोठा, पहा 19 वर्षानंतर दिसतोय इतका हँडसम…

‘कभी खुशी कभी गम’ मधील शाहरुख-काजोलचा मुलगा आता झालाय मोठा, पहा 19 वर्षानंतर दिसतोय इतका हँडसम…

करण जोहर दिग्दर्शित बऱ्याच चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एकत्र कुटुंबाचे महत्त्वं, प्रेम, मोठ्यांचा आदर, विनोदबुद्धी अशा अनेक गोष्टींची मांडणी करत करण जोहरने त्याचे चित्रपट प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे कभी खुशी कभी गम.

या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान आहे. आजही लोकांना हा चित्रपट बघायला खूप आवडतो. शाहरुख खान, काजोल, अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन आणि करिना कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बराच लोकप्रिय झाला.

इतकेच नाही तर या चित्रपटात काजोल आणि शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारणार्‍या बालकलाकार जिब्रान खानसुद्धा प्रेक्षकांना विशेष आवडला होता. 2001 मध्ये आलेल्या या चित्रपटाला आता 19 वर्षे झाली आणि त्यानंतर जिब्रानमध्येही बरेच बदल झाले आहेत.

निरागस मुलाची भूमिका साकारणाऱ्या जिब्रान खानची पर्सनालिटी आता जबरदस्त झाली आहे. इतकेच नाही तर इतर सर्व सेलिब्रिटींप्रमाणेच जिब्रान खानही सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असतो. इन्स्टाग्रामवर त्याचे 1 लाख 40 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

जिब्रान अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. जिब्रान खान आता 27 वर्षांचा झाला आहे आणि तो सध्या आपल्या आगामी चित्रपट ब्रम्हास्त्र च्या तयारीत व्यस्त आहे. रणबीर कपूर, आलिया भट्टसोबत तो या चित्रपटात दिसणार आहे. कभी खुशी कभी गम या चित्रपटात शाहरुख आणि काजोल एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर लग्न करतात आणि यूकेमध्ये स्थायिक होतात.

त्याच वेळी, त्यांना एक क्रिश नावाचा मुलगा दाखवला गेला आहे. त्या मुलाच्या भूमिकेत जिब्रान खान दिसला होता. परदेशात भारतीय संस्कृती जाणीवपूर्वक जपण्यासाठी सतत हट्ट करत असलेल्या आईला कसं आनंदी ठेवायचं हे या चिमुकल्या क्रिश ला चांगलेच माहिती होते.

शालेय कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत गाऊन आपल्या देशावर आणि आईवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची त्याची आगळीवेगळी पद्धत आजही अनेकांच्याच लक्षात आहे. जिब्रान मॉडेलिंग विश्वात सक्रिय असून, तो डान्स इन्स्ट्रक्टरही आहे.

अभिनय, मॉडेलिं-ग आणि नृत्याव्यतिरिक्त शा-रीरिक स्वास्थ्य जपण्याकडेही त्याचा कल आहे. याचा प्रत्यय आपणास त्याचे जिममधील काही फोटो पाहून येतो. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शामक दावरकडून जिब्रानने डान्स शिकला असून, आता तो त्याच्या सहायकाच्या भूमिकेतही दिसतो.

इतकच नव्हे, तर त्याची स्वत:ची डान्स अकॅडमी असून, आता तो इतरांनाही ही डान्स शिकवतो. या मल्टीस्टारर फॅमिली ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.एवढेच नाही तर या चित्रपटाच्या गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करण जोहरने केले होते तर यश जोहर हे चित्रपटाचे निर्माते होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.