१९ वर्ष्यापुर्वी केबीसीमध्ये १ कोटी जिकणारा ‘हा’ मुलगा सध्या काय करतो ? वाचून थक्क व्हाल

१९ वर्ष्यापुर्वी केबीसीमध्ये १ कोटी जिकणारा ‘हा’ मुलगा सध्या काय करतो ? वाचून थक्क व्हाल

कोणाचे नशीब कधी बदलल याबाबत काहीही सांगता येत नाही. एखाद्या कफल्लक माणसाला एखाद्या वेळी एक कोटी रुपये सापडून त्याचे नशीब बदलल्याचे आपण ऐकलं असेल. तर एखाद्या वेळेस रिक्षाने प्रवास करताना लाखो रुपयाची बॅग रिक्षाचालकाला सापडल्याचे ही आपण वाचले असेल. मात्र, प्रामाणिक रिक्षाचालकाने ती बॅग परत केल्याचे उदाहरण आपण पाहिले असेल.

या जगामध्ये इमानदारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गेल्या काही वर्षापासून टीव्ही शोच्या माध्यमातून अनेक शो सुरू झाले आहेत. या शोमध्ये कोट्यावधीची रक्कम इनाम म्हणून ठेवण्यात येते. तसेच सामान्य ज्ञानाच्या आधारावर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देऊन काही कोटी रुपये जिंकायची संधी मिळते.

एकोणीस वर्षांपूर्वी कौन बनेगा करोडपती जूनियर केबीसी ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेमध्ये 2001 मध्ये एक 14 वर्षाचा चुणचुणीत मुलगा सहभागी झाला होता. अतिशय उत्तम संभाषण चातुर्य व हुशार असलेला हा मुलगा सर्वांचेच मन जिंकून गेला होता. त्याचे नाव होते रवी मोहन..

अमिताभ बच्चन यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले होते. तसेच त्याने देखील या प्रश्नांची उत्तरे दिली होती. मात्र, ज्यावेळी खरा एपिसोड सुरू झाला त्यावेळी त्याला 15 प्रश्न विचारण्यात आली. 15 प्रश्नांसाठी एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. रवी मोहन याने पंधरा प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊन एक कोटी रुपये जिंकले.

त्यानंतर तो कधीही माध्यमात चर्चेत आला नाही. तर आता तो काय करतो याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली असेल. पुढे त्याने शिक्षण घेऊन मोठा झाला त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवा रुजू केली आहे.

2014 मध्ये त्याने यूपीएससीची परीक्षा पास करून आयपीएस उत्तीर्ण केले आहे. आता तो पोरबंदर येथे एसपी आहे. सध्या त्याचे वय 33 वर्ष आहे. तसेच आपल्या प्रशासकीय धडाडीने तो गुंडांवर नियंत्रण मिळत आहे. तसेच अवैध धंदे करणार्‍याचा तो कर्दनकाळ बनला आहे

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.