‘दोन’ आठवडे केवळ ‘हा’ एकच उपाय केल्याने ‘रोखू’ शकता केसगळती….

घनदाट केशसंभार हे अबालवृद्ध प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र सध्याचे वाढते प्रदूषण, धूळ आणि आहारातील बदल यामुळे केस गळती, केसातील कोंडा यासारख्या केसांशी निगडित समस्या निर्माण होतात. केसगळती ही केसांशी निगडित समस्यांपैकी एक प्रमुख समस्या आहे. केस गळती रोखण्यासाठी निरनिराळ्या आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबल्या जातात.
त्याचप्रमाणे सध्या अनेक महागड्या केशरोपण पद्धतीसुद्धा अवलंबल्या जातात.घरगुती उपाय सुद्धा केस गळती रोखण्यासाठी खूप प्रभावी ठरतात असे दिसून आले आहे. घरगुती वापरातील काही पदार्थ केस गळती रोखण्यासाठी अगदी खात्रीशीर उपाय मानले जातात.
केसांच्या मुळाशी कांद्याचा रस लावला असता केस घनदाट बनतात कारण कांद्यामध्ये सल्फर हा केसांच्या मुळांद्वारे घेतला जातो.
कांद्याचा वापर करून केस गळती रोखण्यासाठी कांद्याचा वापर योग्य पद्धतीने करणे खूप आवश्यक असते. कांद्याचे बारीक काप करून घ्यावेत या बारीक कापांना मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर बारीक वाटून घ्यावे. या वाटण्याला तलम कापडमधून पिळून व्यवस्थित गाळून घ्यावे. हे मिश्रण आपण रोज वापरत असलेल्या तेलामध्ये मिसळून केसांच्या मुळाशी नीट मसाज करावी. हे मिश्रण त्यावर थोडा वेळ तसेच राहू द्यावे व नंतर ते धुऊन टाकावे.
कांद्याच्या वापरामुळे नवीन केससुद्धा उगवतात असे काही संशोधनांमध्ये दिसून आले आहे.नवीन केस उगवण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. कांद्यामधील सल्फर मुळे कॉलेजन यांच्या निर्मितीत सहाय्य मिळते.