दोन वर्षाच्या आजरी चिमुरड्यासाठी पंधराशे किलोमीटरहून आले एक लिटर उंटाचे दूध.

महामरीमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे कुणालाही कुठेही जाणे शक्य होत नाही. याचाच भाग म्हणून रेल्वे सेवा विमान सेवा आणि बस सेवा देखील बंद आहे.
मात्र, तेलंगणा भागातील सिकंदराबाद येथील एका चिमूरड्यासाठी एक लिटर उंटाचे दूध तब्बल पंधराशे किलोमीटरहून आले आहे. तेलंगणा प्रांतातील सिकंदराबाद मधील दोन वर्षाची मुलगा आजारी पडला होता.
त्यानुसार, राजस्थानच्या संबंधित अधिकाऱ्याने मुंबईतील बांद्रा स्टेशनवर हे दूध पोहोचले. मुंबईत दूध आल्याआल्या मिश्रा यांनी हे दूध सिकंदराबाद येथे पोहोचले. अशा प्रकारे केवळ 28 तासांमध्ये पंधराशे किलोमीटरचा प्रवास करून एक लिटर दूध संबंधित मुलापर्यंत पोहोचले.
या मुलाची प्रकृती आता चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागात आज देखील उंटाचे बकरीचे आणि गाढवाचे दूध मोठ्या प्रमाणात आजारी मुलांसाठी वापरण्यात येते.