वीस वर्षीय युट्यूबर कॅरी मिनाटी आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल हैराण

भारताचा लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटी उर्फ अजय नागरने काही दिवसापूर्वी भारताच्या क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला पबजी खेळण्याचे चॅलेंज दिले होते. त्याच्या चॅलेंजवर धोनीने काहीच उत्तर दिले नाही. पण, कॅरी मिनाटी चर्चेत आला होता. प्रत्येकाला त्याच्या यशाचे रहस्य जाणून घ्यायचे होते.
फार कमी लोकांना माहित असेल की कॅरी मिनाटीचे सोशल मीडियावर महेंद्र सिंग धोनीपेक्षा जास्त फॅन आहेत. वीस वर्षांचा असणाऱ्या अजय नागरचे युट्यूबवर चाहत्यांची संख्या लाखांमध्ये आहे. नुकताच कॅरी मिनाटीचा युट्यूब व्हर्सेस टिकटॉक हा व्हिडिओ खूप चर्चेत आला होता.
पण, हा व्हिडिओ मापदंड विरोधी असल्याचे सांगत युट्यूबने डिलिट केला होता. हा व्हिडिओ डिलीट केल्यानंतर कॅरी भावूक झाला होता आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी असंख्य चाहते पुढे सरसावले होते.
कॅरी मिनाटीचा जन्म 12 जून, 1999 साली हरियाणातील फरीदाबाद येथे झाला. पुढील महिन्यात तो 21 वर्षांचा होईल. त्याच्या कुटुंबात आई वडिलांव्यतिरिक्त मोठा भाऊ यश नागरदेखील आहे. यश गिटारवादक आणि म्युझिक कंपोजर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कॅरी मिनाटीकडे जवळपास 27 कोटींची संपत्ती आहे. कॅरीला बालपणापासून व्हिडिओ गेम खेळण्याचा छंद होता आणि त्यामध्येच करियर केले.
कॅरी मिनाटीने 30 ऑक्टोबर 2014ला युट्यूबवर गेमिंग चॅनेल अॅडिक्शन ए1 सुरू केले. या चॅनेलवर तो काउंटर स्ट्राइक खेळत होता आणि सनी देओल व ऋतिक रोशनच्या आवाजात कमेंट्री करायचा. महिन्याभरात त्याने 150 व्हिडिओ बनविले. हा खेळ जास्त भारतात सुपरहिट ठरला नाही. त्यानंतर कॅरीने चॅनेलचे नाव कॅरी देओल केले.
त्यानंतर कॅरी मिनाटी रोस्टिंग करू लागला. अजय नागर पहिला भारतीय युट्यूबर आहे ज्याने रोस्टिंग कंटेटची सुरूवात केली होती. नंतर त्याने चॅनेलचे नाव बदलून कॅरी मिनाटी केले.