3 क्रिकेटर, ज्यांनी आपल्या फॅन्सशीच केले आहे ‘लग्न’..!

आपल्या देशात क्रिकेट हा खेळ फक्त खेळला जात नाही तर त्याच्याशी आपल्या सर्वांच्या भावना जुळलेल्या आहेत. क्रिकेटला आपल्या देशात देवाप्रमाणे पूजतात. क्रिकेटचे भारतात किती महत्त्व आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे.
आपण अनेक जण क्रिकेटचे सामने बघण्यासाठी हातातले काम बाजूला ठेवून सामने बघत असतो. काही क्रिकेट चाहते तर क्रिकेटच्या वेळापत्रकानुसार आपल्या कामाचा वेळ ठरवतात. आणि काही अतिउत्साही चाहते क्रिकेट बघण्यासाठी थेट मैदानात जातात.
1. एसएस धोनी- साक्षी सिंग धोनी
भारतातील सर्वात लोकप्रिय आणि ज्यांची सर्वात जास्त चर्चा झाली. ज्या जोडीवर एक चित्रपटही तयार झाला ही जोडी अर्थात एम एस धोनी आणि साक्षी धोनी. धोनी आणि साक्षीचे लग्न 2010 मध्ये झालेले 2015 मध्ये त्यांना जीवा नावाची एक मुलगी देखील झाली.
साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून तिने ताज बेंगाल वगैरेसारख्या मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी केली आहे. ती याच हॉटेलमध्ये एका दिवशी एम एस धोनीला भेटली होती. ती हॉटेलमध्ये इंटर्नशिप करत होती आणि तिचा शेवटचा दिवस होता, त्या दरम्यान तिची भेट एम एस धोनीसोबत झाली.
ती एम एस धोनी ची खूप मोठी चाहती होती. एम एस धोनीही तिला पाहताच तिच्या प्रेमात पडला आणि त्याने तिचा नंबर मॅनेजर कडून घेतला व जेव्हा तिला मेसेज केला तेव्हा तिला असे वाटले की आपल्यासोबत कुणीतरी थ्ट्टा मस्ती करत आहे. अनेक वेळा साक्षी संघाला पाठिंबा देण्यासाठी हजर असते.
2. रोहित शर्मा- रितीका सजदेह
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा यांचे लग्न रितीका सजदेहबरोबर झाले आहे. रितिका स्पोर्ट्स मॅनेजर असून तिचे अनेक क्रिकेटपटू सोबत चांगले संबंध आहेत. रोहित शर्मा सोबत लग्न होण्यापूर्वी रितिका स्पोर्ट मॅनेजर होती.
ती तिच्या चुलत भावाची कंपनी काॅर्नरस्टोन स्पोर्ट्स व इंटरटेनमेंटमध्ये स्पोट्स मॅनेजर म्हणून काम करत होती. रितिकाची रोहित शर्मा बरोबर ओळख होण्याआधी तिची हरभजन सिंग आणि युवराज सिंग बरोबर आधीपासूनच चांगली ओळख होती. परंतु रितिका रोहित शर्माची कट्टर चाहती होती
3. नवाब पतौडी खान- शर्मिला टागोर
नवाब मन्सुर अली खान पतौडी हे भारताचे सर्वात तरुण कर्णधार होते. शर्मिला टागोर यांच्याशी बराच काळ त्यांची मैत्री होती, शर्मिला टागोर मोठ्या अभिनेत्री असल्या तरी पतौडी यांचा खेळ पाहण्यासाठी त्या स्टेडियमवर जात असत. त्या त्यांच्या मोठ्या चाहत्या होत्या त्यानंतर, त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी 1969 साली लग्न केले.