वयाच्या 50 व्या वर्षी मुलीचा बाप बनला ‘हा’ अभिनेता, पहा लॉकडाऊन मध्येच केले होते दुसरे लग्न…

मनोज तिवारी हे लोकप्रिय भोजपुरी अभिनेता आहे. ससुराल बडा पैसावाला या चित्रपटातून त्यांनी चित्रपटात पदार्पण केले. त्यांचे धरती काहे पुकार के, भोले शंकर, जनम जनम के साथ, ऐलान, अंधा असे अनेक चित्रपट गाजले आहेत. अभिनेता असण्यासोबतच राजकीय विश्वातदेखील ते तितकेच कार्यरत आहेत. सध्या ते उत्तर पूर्व दिल्लीचे खासदारही आहेत. तसंच दिल्ली भाजपचे अध्यक्षपदही भूषवत आहेत.
भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपा खासदार मनोज तिवारी यांना 30 डिसेंबर रोजी मु’लगी झाली आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज दिली आहे. ही गोड बातमी सांगताना त्यांनी त्यांच्या चिमुकलीचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एका बातमीनुसार मनोज तिवारी म्हणाले होते की त्यांची पत्नी राणी ही अतिशय संशयास्पद महिला आहे. जेव्हापासून मनोज तिवारी बिग बॉसचा भाग बनले होते. तेव्हापासूनच पत्नी राणी आणि त्यांच्यात दुरावा वाढला होता. बिग बॉस मधून आल्यानंतर त्यांनी पत्नी राणीशी घटस्फो-ट घेतला.
मनोज तिवारी यांनी गेल्या काही वर्षात राजकारणात चांगलाच जम बसवला. मात्र त्यांची भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार म्हणून ते अधिक लोकप्रिय आहेत. गायन क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर 2004 साली त्यांनी ससुराल बडा पैसेवाला या भोजपुरी सिनेमातून डेब्यू केला. त्यांचा पहिलाच सिनेमा सुपरहि-ट झाला होता.
तर गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी जिया हो बिहार के लाला हे गाणेही त्यांनी गायले. त्याबरोबरच 2010 मध्ये बिग बॉस च्या चौथ्या सिझनमध्ये ते स्पर्धक म्हणून दिसले होते. वर्ष 2009 साली सपाच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढली. मात्र त्यांचा पराभव झाला.
यानंतर वर्ष 2013 साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पूर्व दिल्लीतून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर ते दिल्ली भाजपचे अध्यक्षही बनले. चित्रपटांबरोबरच राजकारणातही सक्रिय असलेले मनोज तिवारी सध्या भाजपचे खासदार असून पूर्व दिल्लीतून ते खासदार म्हणून निवडून आले आहेत.