लष्करात अधिकारी असलेल्या मुलाचा मृत्यू, लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी आई-वडिलांचा रस्त्याने २००० किमीचा प्रवास…

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सध्या संपूर्ण जनता ही जणू काही एखादे युद्ध लढण्यासाठी सज्ज झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लाँकडाऊन च्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन सर्व स्तरांमधून केले जात आहे.
लाँकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त अन्य कोणालाही बाहेर वावरण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. अत्यावश्यक सेवां मध्ये वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा, पोलीस सेवा व सैन्यदल इत्यादींचा समावेश होतो.
हे दांपत्य म्हणजे जम्मू-काश्मीरमधील धाडसी व साहसी कामगिरीसाठी शौर्य पुरस्कार प्राप्त झालेले कर्नल नवजोत सिंह बल यांचे आई-वडील होय. कर्नल नवज्योत सिंह बल या ३९ वर्षीय तरुण सैन्यदलातील अधिकाऱ्यांचा बंगलोर येथे कँन्सरवरील उपचार घेत असताना मृत्यू झाला.
त्यांचे आई-वडील गुरुग्राम येथे राहत आहेत. मुलाच्या मृत्यूची बातमी कळतात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी जावून त्याला अखेरचे पाहण्याच्या भावनेने त्यांचा जीव व्याकूळसुद्धा झाला.
अशा परिस्थितीमध्ये लाँकडाऊनमुळे रेल्वेसेवा, हवाई सेवा व सार्वजनिक बस सेवा सुद्धा बंद आहेत. सध्या हवाई सेवा बंद असल्यामुळे भारतीय गृहमंत्रालयाकडून लष्करी विमानाची सोय करण्यासंबंधीचे आदेश देण्यात आले होते.
मात्र हवाई वाहतूक विभागाकडून यासंदर्भात कोणतेही आदेश न मिळाल्यामुळे लष्करी विमानाची सोय होऊ शकले नाही. मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले पाहिजे म्हणून या दांम्पत्याने रस्त्याने गाडीमधून बेंगलोरला जाण्याचा निश्चय केला. गुरुग्रामवरुन बंगलोर ला जाण्याचे एकूण अंतर साधारण दोन हजार किलोमीटर आहे.
मात्र आपल्या वयाचा वा तब्येतीचा विचार न करता त्यांनी पुढच्या क्षणी या प्रवासाला सुरुवात केली. कर्नल नवजोत सिंह बल यांचे अंतिम संस्कार सुद्धा बेंगलोर येथेच करण्याचा निर्णय लाँकडाऊन ची परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या आईवडिलांनी घेतला.
हे दांपत्य शुक्रवारी दोन हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाले ते शनिवारी बेंगलोर येथे पोहोचले. कर्नल नवजोत सिंह बल हे गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. जम्मू काश्मीर येथे दहशतवाद विरोधी ऑपरेशनमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते.
त्यानंतर त्यांची नियुक्ती आर्मीमध्ये स्पेशल फोर्स अधिकारी म्हणून करण्यात आली होती. कर्नल नवज्योत सिंह बल हे अतिशय झुंजार असे अधिकारी होते याची प्रचिती मृत्यूच्या काही तास अगोदर त्यांनी फोनवर हॉस्पिटल मध्ये आपले स्वतःचे फोटो क्लिक केले होते.
मृत्यूच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकताना दिसते. कर्नल नवजोत सिंह बल यांच्या पश्चात त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुले हे कुटुंबीय आहेत.