आपल्यापेक्षा १२ वर्ष लहान या कोरिओग्राफरशी प्रकाश राज यांनी केलं लग्न…

खलनायकाची भूमिका साकारूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते म्हणजे प्रकाश राज. प्रकाश राज यांनी नुकताच आपला ५५ वा वाढदिवस साजरी केला. बॉलिवूडचे गणी भाई, जयकांत शिक्रे अर्थात प्रकाश राज यांनी दमदार अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये एक एक वेगळीच ओळख आहे. प्रकाश राज यांनी आजवर तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी या विविध भाषांमधील चित्रपटांत काम केले आहे. त्याचबरोबर आपल्या मतांमुळे देखील प्रकाश राज नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर आपले मत मांडून प्रकाश राज नेहमी नवीन गोष्टीला वाचा फोडत असतात. पण आज आपण प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत.
प्रकाश राज यांचा बेंगळुरूच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांना दोन मुली आहेत. प्रकाश राज यांनी १९९४ साली ललिता यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर प्रकाश राज यांनी त्यांच्यापेक्षा वयाने १२ वर्षांनी लहान कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्नगाठ बांधली. आपल्या दोन्ही मुलींची परवागनी घेऊनच त्यांनी पोनीशी लग्न केलं.
याबद्दल प्रकाश राज यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “पोनी माझ्या एका चित्रपटासाठी कोरिओग्राफी करत होती. मी माझ्या आई व मुलींना तिच्याविषयी सांगितलं. तिच्याशी लग्न करायची इच्छा त्यांना बोलून दाखवली. लग्नापूर्वी पोनी आणि माझ्या मुलींची भेट घालून दिली. मुलींची परवानगी घेतल्यानंतर मी पोनीच्या वडिलांची भेट घेतली आणि तिला लग्नाची मागणी घातली.”
प्रकाश राज यांनी ‘वॉटेंड’, ‘सिंघम’, ‘दबंग’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. पण त्यांनी वॉटेंडमध्ये साखरलेली गणीभाईची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली.