‘सर्जरी केल्यामुळे’ स्वतःच करियर संपवून बसली ‘हि’ अभिनेत्री, सलमान सोबत दिला होता ३०० कोटींचा हिट चित्रपट

एकेकाळी या अभिनेत्रीने आपल्या घायाळ करणा-या सौंदर्याने सा-यांची पसंती मिळवली होती. तिने अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री आयशा टाकिया आहे. आयशा टाकीया एकेकाळी बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध आणि आघाडीची नायिका मानली जायची.
आयशा टाकियाने तिच्या अभिनय कारकीर्दची सुरुवात ‘टार्जन द वण्डर कार’ या चित्रपटातून केली होती. पण हा चित्रपट पाहिजे तितका प्रसिद्ध झाला नाही. परंतु, हा चित्रपट आजही टेलिव्हिजनवर खूप आवडीने पाहिला जातो. त्यानंतर आयशाने सलमान खानसोबत ‘वांटेड’ या चित्रपटात काम केले आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.