‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील ‘अय्यर’ आहे चक्क ‘मराठी’ अभिनेता नाव आहे….

तारक मेहता का उलटा चष्मा मालिका कुणी पाहत नसेल अशी व्यक्ती मिल्ने कठीण. या मालिकेतील अय्यर आपल्याला माहीतच असेल. अत्यंत लोकप्रिय असलेली आणि खूप वर्षांपासून आजही ही तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका आजही लोकांचे मनोरंजन करत आहे.
ही मालिका तुम्ही पाहतच असाल या मालिकेत सर्व धर्म समभाव आपल्याला बघायला मिळतो. या मालिकेत अय्यर हा साऊथ इंडियन बोलणारा अभिनेता चक्क मराठी आहे हे तुम्हाला माहित नसेल पण हे खरं आहे. त्याने अगदी हुबेहूब एखाद्या साऊथ इंडियन व्यक्तीचा अभिनय केला आहे. हा अभिनय त्याने इतका उत्तम केला आहे की त्याला सगळे साऊथ इंडियनच समजतात.
या मराठी अभिनेत्याच नाव ‘तनुज महाशब्दे’ आहे. तनुज म्हणतो की, या भूमिकेची त्याला इतकी सवय झाली आहे की घरात बोलतानाही त्याच्या तोंडातून साऊथ इंडियनच भाषा निघते. पण आता त्यातून निघण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करत आहे. तनुज महाशब्दे यांना जेव्हा हा रोल करायची ऑफर आली होती तेव्हा हा अभिनेता चक्क साऊथ फिरायला गेला होता.
लहानपणापासून त्याला नाटकाची आवड होती म्हणून त्याने लहानापासून अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. लहान असताना त्याला जास्त करून रावणाची भूमिका करायला मिळाली होती. त्यांचे म्हणणे होते की मी काळा असल्याने दुसरी भूमिका मिळणे माझ्यासाठी खूप अवघड होते.
तारक मेहता का उलटा चष्मा या मालिके बाबत बोलताना ते सांगतात की या मालिकेच्या सेटवर पोचल्यावर घरी आल्यासारखे वाटते तिथे सर्वच एकमेकांची सुखात आणि दुःखात मदत करतात.