ऍक्टरपेक्षा कमी नाहीये कॅटरिना कैफचा ‘बॉडीगार्ड’. पहा फोटो.

फिल्म स्टार्सच्या बॉडीगार्ड्समध्ये आतापर्यंत फक्त सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या नावाची चर्चा होते. म्हणजेच बहुतेक लोक शेराला त्याच्या नावानेच ओळखतात. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अजून एका बॉडीगार्डशी ओळख करून देणार आहोत ज्यांनी आतपर्यंत अनेक ऍक्टरेस आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना संरक्षण दिले आहे.
आपण आज बोलणार आहोत अभिनेत्री कॅटरिना कैफचा बॉडीगार्ड ‘दीपक सिंह’बद्दल आहे. जो दिसायला एखाद्या बॉलिवूड सेलेब्रिटी पेक्षा कमी नाही. त्याची राहण्याची स्टाईल त्याचा स्वैग इतका भारी आहे की भल्याभल्यांना त्याचा हेवा वाटेल. उंची, फिट बॉडी आणि गॉगल्स लावून जेव्हा दीपक कतरिनाच्या सोबत निघतो तेव्हा त्याच्या एक वेगळाच रुबाब असतो.
तुम्हांला कदाचित विश्वास बसणार नाही पण दीपक सिंगला बर्याच चित्रपटांच्या ऑफरही आल्या, पण त्या ऑफर त्यांनी स्वीकारल्या नाहीत. दीपक सिंह हा आर्मी ऑफिसर अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याला कधीच बॉडीगार्ड व्हायचे नव्हते. त्याचे स्वप्न क्रिकेटपटू होण्याचे होते.
दीपक सिक्युरिटी एजन्सीचा मालकही आहे. त्याची स्वतःची सुरक्षा एजन्सीही आहे. असे असूनही, तो चित्रपटातील कलाकारांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतो. शाहरुखपासून ते अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना दिले आहे संरक्षण.
कतरिनाशिवाय दीपक सिंगने शाहरुख खानपासून माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रणवीर सिंग, राणी मुखर्जी, सचिन तेंडुलकर आणि अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना संरक्षण दिल आहे.
अनेक कलाकारांनी चित्रपटात काम करायला सांगितले.
दीपक सिंह यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की चित्रपट निर्मात्यांपासून ते अभिनेते आणि नृत्यदिग्दर्शकांनी त्याला अभिनय करण्यास सांगितले होते. पण मी तसे केले नाही.