हा होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, ‘आफ्रिका खंड’ विकत घेऊ शकेल एवढी होती संपत्ती…

श्रीमंत लोकांचा विषय निघाला तर आपल्या तोंडून टाटा, बिर्ला, अंबानी ही तीन नावे सहज निघून जातात. भारतात मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत आहेत हे आपण जाणतो आणि जगातल्या श्रीमंत व्यक्तींचा विषय निघाला असता बिल गेट्स, वॉरन बफे, आणि अमेझॉन चे संस्थापक जेफ बेझोस यांच्या विषयी आपण बोलतो. पण इतिहासात एक सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊन गेला आहे की त्याच्या संपत्तीचा अंदाज कोणीही लावू शकला नाही.
त्या व्यक्तीचं नाव आहे मनसा मुसा. 1280 साली जन्मलेल्या मनसा मुसा ने 1312 मध्ये आफ्रिकेतील माली साम्राज्यावर कब्जा केला होता. मनसा मूसा मीठ आणि सोन्याचा व्यापारी होता. मनसा मुसा चे खरे नाव मुसा किटा असे होते पण टिंबक्टु चा राजा झाल्यानंतर त्याला मनसा ही पदवी मिळाली मनसा म्हणजे सुलतान किंवा सम्राट होय.
सन 1324 पर्यंत त्याच्याकडील संपत्ती ची माहिती जगाला नव्हती. मुसा कडे जवळपास 4 लाख मिलियन अमेरिकन डॉलर ची संपत्ती होती. आपल्या कार्यकाळात त्याने साम्राज्याचा विस्तार केला. आज आफ्रिकेतील घाना, सुदान, नायजर, चाड, केनिया हे देश त्याच्या साम्राज्या अंतर्गत येत असत.