ऐश्वर्यापासून लांब राहा, संजय दत्तला त्याच्या जवळच्याच व्यक्तीने दिली होती धमकी, धमकी देणाऱ्याचे नाव वाचून चकित व्हाल

ऐश्वर्या रायला सौंदर्याची खाणच म्हटले जाते. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. संजय दत्त आणि ऐश्वर्या यांनी शब्द, हम किसी से कम नही यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
संजय आणि ऐश्वर्याच्या जोडीला हिट चित्रपट देता आले नसले तरी खाजगी आयुष्यात त्यांची चांगली मैत्री आहे. दोघांनी चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याआधी एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी शूट केले होते. त्यावेळेचा मजेदार किस्सा संजयने एका मुलाखतीत सांगितला होता.
त्यामुळे तिच्यासोबत फोटोशूट करण्याआधीच मला त्या दोघींनी धमकी दिली होती की, तिला पटवण्याचा विचारसुद्धा करू नकोस…. काम करताना तू तिचा नंबर घ्यायचा नाहीये की तू तिला कोणतीही भेटवस्तू देखील द्यायची नाहीये. संजय दत्तने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.
ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ऐश्वयाचे अख्खे बालपण मुंबईत गेले आणि याच मुंबईत राहून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवण्यापर्यंतचा तिचा प्रवास डोळे दिपवणारा आहे.