अखेर, मृत्यूच्या पाच दिवसानंतर ऋषी कपूर यांची ‘ती’ इच्छा झाली पूर्ण.. मृत्यू होण्याआधी केले होते ट्विट

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे काही दिवसांपूर्वीच कॅन्सरसारखा दुर्धर आजाराने निधन झाले होते. त्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. सध्या बंदीमुळे अंत्यविधीला 20 पेक्षा अधिक माणसांना जाता येत नाही. त्यांच्या अंत्यविधीला देखील कुटुंबातील लोक उपस्थित होते.
ऋषी कपूर आपल्या बेधडक स्वभावासाठी अतिशय प्रसिद्ध होते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सरकार आणि चुकीच्या गोष्टींवर अनेकदा निशाणा साधत असायचे. तसेच आपले मन मोकळे करण्यासाठी सोशल मीडियातून ते अनेकदा tweet करायचे. ट्विटर’वर ऋषी कपूर व्यस्त असायचे.
मृत्यूच्या केवळ सहा दिवस आधी ऋषी कपूर यांनी दारू दुकाने उघडण्यास संबंधित सरकारला विनंती करून ट्विट केले होते. ट्विटमध्ये ते म्हणाले होते, विचार करा, संध्याकाळच्या वेळेस काही वेळेसाठी सरकारने दारू दुकाने सुरू करण्यास काय हरकत असावी. सध्या सर्वजण घरीच आहेत.
सर्वत्र नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे अनेकांना मोकळा वेळ आहे. अशावेळी ते त्याचा सदुपयोग करू शकतात. पोलीस, डॉक्टर हे अतिशय तणावाखाली जगत आहेत. त्यामुळे दारू चालू केली तर बरे होईल.
एकीकडे सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण असताना सरकारच्या महसुलात देखील यामुळे भर पडेल. मी हे मुद्दाम सांगत नाही आहे, तर त्याचा फायदा होईल, यामुळे हे सांगत आहे. कोणाला याचा राग येण्याचे कारण नाही.
दरम्यान, ऋषी कपूर यांच्यानंतर अनेक बॉलीवूड अभिनेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला. दरम्यान, ऋषी कपूर या जगातून गेल्यानंतर नंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे रेड झोन सोडून दारू दुकाने सुरू केली आहेत.
महाराष्ट्रामध्ये एका दिवसात तब्बल दोनशे कोटी रुपयांची दारू विक्रीला गेली आहेत. दारुमुळे दुसरीकडे भांडणे होताना देखील पाहायला मिळाले.