अक्षय कुमारच्या फिटनेस मागे आहे ‘या’ सुंदर महिलेचा हात ; सावलीप्रमाणे असते अक्षयसोबत…

अक्षय कुमारच्या फिटनेस मागे आहे ‘या’ सुंदर महिलेचा हात ; सावलीप्रमाणे असते अक्षयसोबत…

सुरुवातीपासूनच, बॉलीवूड मधील सगळ्यात फिट अभिनेता म्हणून, खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार ओळखला जातो. ५३ वर्षांचा अक्षय आजदेखील सध्याच्या, फिट अभिनेत्यापेक्षा जास्त फिट आणि आकर्षित दिसतो. त्याच्या ह्या फिटनेस चे सगळेच फॅन आहेत.

त्याच्या यशाचे श्रेय जरी त्याची पत्नी ट्वीनकल असली तरी त्याच्या फिटनेसचे श्रेय मात्र तिला नाही तर दुसऱ्या एका सुंदरीला जाते. बॉलीवूडमध्ये एकमेव अक्षय कुमार असा अभिनेता आहे जो, अगदी अनुशासनप्रिय आहे. कोणत्याही धामधुमीच्या शिवाय तो अगदी नियमांचे पालन करत आपले आयुष्य जगतो.

इतक्या वर्षांच्या कालावधीत, जेनिफर अक्षयच्या कुटुंबातील एक सदस्यच झाली आहे. ह्या जेनिफर सिंहला जेन सिंह म्हणून सगळीकडे ओळखले जाते. जेनिफर एखाद्या बॉलीवूडच्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे. तिचा फिटनेस आणि तिचे सौंदर्य हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे.

स्वतःला ती अगदी उत्तम प्रकारे सादर करते, तिला बघितले कि एखाद्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीला किंवा फॅशन दुनियेतील एखाद्या मॉडेलला बघितल्या सारखेच वाटते. ती नेहमीच अक्षय सोबत असते, आणि त्यामुळे अनेक वेळा तिला त्याच्यासोबत बघण्यात आले आहे. अक्षय सोबत राहून ती त्याच्याकडून, त्याचे रुटीन फॉलो करुनच घेते.

डायट सोबतच वर्कआऊट सर्व काही जेनिफर ठरवते आणि ते अक्षय कडून करवून देखील घेते. त्याच्या फिटनेसच्या बाबतीत सर्व काही जेन सिंह चे जातीने लक्ष देऊन करते. अक्षय कुमार ची फिटनेस ट्रेनर असल्यामुळे, बॉलीवूडमधील बऱ्याच कलाकारांना, दिग्दर्शकांना जेनिफर ओळखते. आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरुन ती अनेक वेळा अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि रणवीर सिंह सोबतचे फोटोज शेअर करत असते.

हीच जेनिफर, त्याच्या कुटुंबाच्या देखील खूप जवळची आहे असे बोलले जाते. बऱ्याच वेळा सण किंवा काही कार्यक्रमाच्या वेळी जेनिफर सिंह त्याच्या कुटुंबासोबत बघितली गेली आहे. ती अक्षयच्या कुटुंबियांना देखील फिटनेस टिप्स देत असते. कोणत्याही सिनेमाच्या शूटिंग च्या वेळी जेनिफर त्याच्या सोबतच असते.

प्रत्येक जागी ती त्याच्या डायट आणि वर्कआऊट कडे लक्ष देत असते. एका सिनेमाच्या प्रमोशन च्या वेळी, जेनिफर देखील कपिल शर्माच्या शो मध्ये आली होती आणि तिने कपिल शर्माला देखील काही फिटनेस टिप्स दिल्या होत्या.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.