‘मोगॅम्बो’! मिस्टर इंडिया 2 मध्ये ? हा अभिनेता साकारणार ‘मोगॅम्बो’ ची भूमिका….!

आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आणि कुठेतरी प्रेक्षकांच्या मनाच्या कप्प्यात आजही असणारा चित्रपट म्हणजे मिस्टर इंडिया. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा मिस्टर इंडिया हा सिनेमा त्या काळी सुपरडुपर हिट झाला. हा सिनेमा आजही चाहत्यांना तितकाच आवडतो. अनेकदा या सिनेमाच्या सीक्वलला घेऊन चर्चा झाली आहे. निर्माते बोनी कपूर यांनी या सिनेमाच्या सेकंड पार्टसाठी नकार दिला होता.
परंतु, या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दिग्दर्शक अली अब्बास जफर लवकरच मिस्टर इंडिया 2 बनवणार आहे.
अली अब्बासची अशी इच्छा आहे की, या सिनेमात अनिल कपूरची भूमिका रणवीर सिंगनं साकारावी. या चित्रपटात मोगॅम्बोची भूमिका किंग खान शाहरुख खान करू शकतो पण त्या या गोष्टीला अजून दुजोरा दिलेलं नाही. सर्वकाही ठरल्याप्रमाणे झाले तर हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
मिस्टर इंडिया सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट त्याकाळी सर्वात हिट साइयन्सफिक्शन चित्रपट होता. मिस्टर इंडिया हा सुपरहिट सिनेमा 25 मे 1987 रोजी रिलीज झाला होता. अनिल कपूर आणि श्रीदेवी या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते.
हा सिनेमा चाहत्यांना प्रचंड आवडला होता. आजही हा सिनेमा लोक आवर्जून पाहतात. प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाचे प्रदर्शन या चित्रपटात केले होते. आणि या चित्रपटामुळे अमरीश पुरी यांना देखील खूप लोकप्रियता मिळाली होती.