अलका कुबल नव्हे.. बॉलिवूडची ‘ही’ आघाडीची अभिनेत्री होती ‘माहेरची साडी’ चित्रपटासाठी पहिली पसंत.

अलका कुबल नव्हे.. बॉलिवूडची ‘ही’ आघाडीची अभिनेत्री होती ‘माहेरची साडी’ चित्रपटासाठी पहिली पसंत.

अलका कुबल मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक सोशिक अभिनेत्री म्हणून गाजलेले नाव. अलका कुबल यांनी मराठी चित्रपट सृष्टीला एक नवा आयाम दिला. तसेच अभिनेत्रींनी कसे काम करायचे याचा ट्रेंड देखील त्यांनी घालून दिला. एक काळ असा होता की, अलका कुबलशिवाय मराठी चित्रपट पूर्णच होत नसे.

या दिग्गज अभिनेत्रीने मराठी चित्रपट सृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकला. घर आणि उंबरठा यामधील चित्रपटांची मेजवानी त्यांनी जणू मराठी प्रेक्षकांना दिली. एक सुन कशाप्रकारे सासरी छळल्या जाते, या प्रकारचे त्यांनी अनेक चित्रपट केले. आबालवृद्धांमध्ये अलका कुबल यांचे वेगळे स्थान आहे. 1991 मध्ये दिग्दर्शक विजय कोंडके यांनी एक चित्रपट करायचे ठरवले.

मात्र, नुकताच एक किस्सा समोर आला आहे. दिग्दर्शक विजय कोंडके यांना या चित्रपटासाठी आघाडीची हिंदी अभिनेत्रीला घ्यायचे होते, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ही आघाडीची अभिनेत्री कोण होती..

1991 मध्ये माहेरची साडी हा चित्रपट आला. यामध्ये अलका कुबल यांचे महिलाकेंद्रित प्रमुख पात्र होते. त्याआधी 1989 मध्ये बॉलिवूड स्टार सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन यांचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट आला. भाग्यश्री मराठी असल्याने तिचे प्रचंड कौतुक झाले. त्यामुळेच विजय कोंडके यांनी देखील ‘माहेरची साडी’ या चित्रपटासाठी भाग्यश्रीला घ्यायचे, असे ठरवले.

यासाठी त्यांनी भाग्यश्रीला अनेकदा विचारणा केली. मात्र, ती त्यांना वेळच देत नव्हती, असे करत करत दीड वर्ष गेले. विजय कोंडके तिला दीड वर्ष विचारत राहिले. मात्र, तिने शेवटी नकार दिला. त्यानंतर विजय कोंडके यांनी भाग्यश्रीचा नाद सोडून दिला. ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटातील अलका कुबल यांनी चांगले काम केले होते.

त्यामुळे त्यांनी ‘माहेरची साडी’ या चित्रपटासाठी अलका कुबल यांच्याकडे विचारणा केली. अलका कुबल यांना चित्रपटाची कथा खूप आवडली. त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. त्यानंतर माहेरची साडी हा चित्रपट देशात तसेच महाराष्ट्रात प्रचंड चालला आणि अलका कुबल सारखी उत्कृष्ट अभिनेत्री मराठी चित्रपट सृष्टीला मिळाली.

त्यानंतर अलका कुबल यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. उलट भाग्यश्री हिने मैने प्यार किया हा चित्रपट केल्यानंतर काही चित्रपट केले. त्यानंतर हिमालय सोबत लग्न करून संसारात गुंतून राहिली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *