अंबानी आणि इतर सेलिब्रिटी त्यांच्या ड्रायव्हर्स आणि बॉडिगार्डसला किती पगार देतात?

जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा पगार बघितला जात नसेल तर विचार करून काहीच फायदा नाही, त्यापेक्षा मस्तपैकी चहाच्या टपरीवर निवांतपणे चहा पिण्याची मज्जा घ्या. कारण विचार करून तुमचा पगार वाढणार नाही हे देखील तितकेच खरे.
पण आज आपण बॉलिवूडचे काही कलाकार, नीता अंबानीचा ड्रायव्हरल, त्याचबरोबर करीना कपूर खानचा मुलगा सांभाळणारी आया, दिपीका पादुकोनचा बॉडीगार्ड यांना ते किती पगार देतात, ते आपण आज जाणून घेणार आहोत.
शाहरुख खानचा बॉडीगार्ड
शाहरुख खान त्याच्या बॉडीगार्ड असलेल्या रवी सिंगला वर्षासाठी सर्वाधिक अडीच कोटी इतके मानधन देतो.
तैमूरची आया
करिना कपूरने जाहीरपणे कबूल केले आहे की तिचा पगार हा तिच्या मुलाच्या आनंदात तितकासा मुद्दा नाही. आणि तैमुरबद्दल तर आपण सर्वांना माहितीच आहे सर्वात प्रसिद्ध स्टार कीड पैकी तो एक आहे. म्हणून तैमूरचा सांभाळ करणाऱ्या नानीला १.५० लाख रुपये आणि ओव्हरटाईम काम केल्यास १.७५ लाख रुपये इतकं मानधन देते.
सलमान खानचा बॉडीगार्ड
बॉलीवूड कलाकारांच्या बॉडीगार्ड पैकी सर्वात प्रसिद्ध कुठला बॉडीगार्ड असेल तर तो सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा आहे. सलमान खानने त्याच्या बॉडीगार्डवर बॉडीगार्ड हा चित्रपट देखील काढला होता. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा हा त्याचा खूप जवळचा मित्र आहे. तो २० वर्षांपासून सलमान बरोबर आहे. सलमान त्याला दरवर्षी २ कोटी रुपये इतकं मानधन देतो.
दीपिका पादुकोणचा बॉडीगार्ड
आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की दीपिका पादुकोण आपला बॉडीगार्ड ला आपला भाऊ मानते, आणि दरवर्षी त्याला ती राखी देखील बांधते. दीपिकाच्या बॉडीगार्ड चे नावनाव जलाल आहे जो तिच्याबरोबर सावलीप्रमाणे असतो. दीपिका त्याच्या बॉडीगार्डला दरवर्षी सुमारे ८० लाख रुपये इतकं मानधन देतो.
अक्षय कुमारचा बॉडीगार्ड
बॉलिवूडमधील सर्वात फिट व्यक्ती जो स्वत: चे स्टंट स्वतः करतो त्याच्या बॉडीगार्ड चे नाव श्रेयस आहे. अक्षय कुमार त्याला दरवर्षी १.२ कोटी इतकं मानधन देतो.
आमिर खानचा बॉडीगार्ड
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याचा बॉडीगार्ड युवराज घोरपडे यांना एकूण २ कोटी रुपये मानधन देतो.
नीता अंबानीचा ड्रायव्हर
नीता अंबानीची एक वैभवशाली जीवनशैली आहे. आणि अंबानीच्या घरात झेड सुरक्षा आहे. नीता अंबाणीचा ड्रायव्हर बनण्यासाठी ड्रायव्हरला बऱ्याच चाचण्या द्याव्या लागतात. अंबानी परिवाराचा ड्रायव्हर होण्यासाठी कंपन्यांचा करार झालेला असतो. या कंपन्यांनी ड्रायव्हरचे सखोल प्रशिक्षण घेतल्यानंतर ते पूर्ण झाल्याची खात्री दिली जाते.
ड्रायव्हर कोणतीही अडचण कशी हाताळू शकतो हेदेखील ते पाहतात. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरला खाणे व राहण्याचे अतिरिक्त लाभ देखील दिले जातात. आता नीता अंबाणीच्या ड्रायव्हरला २४ लाख रुपये वेतन दिले जाते.