‘या’ मुलीसोबत लग्न करण्यासाठी आमीर हद्दपार करून बसला होता…

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच १४ मार्चला ५५वा वाढदिवस होता. एकाहून एक हिट चित्रपट देत आजही अमिरची सिने कारकिर्द एकदम परफेक्ट राहिली असून त्याचं वैयक्तिक आयुष्य देखील आता परफेक्ट सुरु आहे. पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद सोबत आमीर खूपच खुश आहे.
आमीरला तीन मूल असून त्यांचे नाव आझाद, इरा आणि जुनैद अस आहे. अमीर जेवढं प्रेम आझादवर करतो तितकंच प्रेम तो इरा आणि जुनैदवर देखील करतो.. आमिर जरी त्याची पहिली पत्नी रिना दत्तापासून वेगळा झाला असला तरी आजही रिना त्याच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. आजही ती त्याच्यासोबत दिसते.
मिळालेल्या माहितीनुसार, आमीरला रिनाला पोटगी म्हणून 50 कोटी रुपये द्यावे लागले होते. आमीर आणि रिनाचा घटस्फोट 2002 साली झाला. आणि त्यावेळचा हा सगळ्यात महागडा घटस्फोट असल्याची चर्चा होती…
विशेष बाब म्हणजे, आमीर आणि रिना यांनी प्रेमविवाह केला होता. दोघांचेही कुटूंबिय त्यांच्या लग्नाला तयार नव्हते. पण आमीर आणि रिना एकमेकांपासून वेगळं राहू शकत नव्हते आणि म्हणून दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं.
कित्येक दिवस दोघांनी त्यांचं लग्न घरातल्यांपासून लपवून ठेवलं होतं. या दोघांनी जेव्हा लग्न केलं तेव्हा रिना शिकत होती त्यामुळे ती तिच्याच घरी राहून शाळेत येत-जात होती तर आमीर त्यावेळी ‘कयामत से कयामत तक’ची शूटींग करत होता…
लग्नाच्या काही दिवसांनंतर आमीरच्या कुटूंबियांनी रिनाला स्विकारलं. मात्र, काही वर्षांनंतर रिना आणि आमीरमध्ये तक्रारी व्हायला सुरुवात झाली आणि त्यांच्यातल्या या तक्रारींना अभिनेत्री ‘प्रिती झिंटा’ कारणीभूत असल्याचं म्हटलं गेलं. कारण आमीर आणि प्रिती त्यावेळी ‘दिल चाहता है’ सिनेमासाठी एकत्र काम करत होते आणि त्याचदरम्यान त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आलं होतं.
त्यावेळच्या माहितीनुसार, रिना याच कारणामुळे आमीरपासून वेगळं राहायला लागली होती. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं कळताच प्रितीने घाबरुन आमीरसोबतच्या तिच्या अफेअरला नकार दिला.
यानंतर आमिर आणि रिनामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू होतं. त्यातंच त्याचं नाव किरण राव सोबत जोडलं जाऊ लागलं.. किरणसोबतच नातं आमीरने न लपवता तिच्यासोबत थेट लग्न करण्याचाच निर्णय घेतला.
आमिरच्या या निर्णयामुळे रिनाला चांगलाच धक्का बसला पण ती काहीच करु शकत नव्हती आणि मग आमिरने किरणसाठी रिनाला घटस्फोट दिला.