आमिर खान आणि किरण राव यांच्या १५ वर्षांचा संसार मोडण्यामागचे खरे कारण आले समोर, २०१९ मध्येच घेतला होता घ’टस्फो’ट !

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे दोघे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक होते. मात्र आता त्यांनी १५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वेगळे होत असल्याची माहिती दिली होती. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता.
या दोघांना आजाद खान नावाचा एक मुलगा देखील आहे. याबाबत माहिती देताना आमिर आणि किरण ने लिहिले आहे की, पंधरा वर्षे आम्ही एकत्र राहिलो. आम्ही अनेक आनंद आणि वाईट प्रसंग एकत्रित जगलो. दोघांचा एकमेकांनी सन्मान देखील केला. मुलगा आजाद साठी आम्ही दोघेही एकत्र येणार आहोत.
आमिर आणि किरण हे दोघेही गेल्या काही वर्षात लग्न या संकल्पनेच्या खूप पुढे निघून गेले होते. त्यांच्यात कोणतेच मतभेद नव्हते. दोघांचे विचार आणि मूल्य एकसारखीच असली तरी त्यांच्या गरजा, आवडीनिवडी, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची मते ही काळानुसार बदलत गेली. त्यात मग प्रेमही होते आणि लग्नही.
त्यामुळे केवळ फ्रेंड्स म्हणून राहू शकतो, या निर्णयाप्रत ते दोघेही आले होते. या रिपोर्ट्समध्ये पुढे लिहिण्यात आले आहे की, आयुष्याच्या त्या टप्प्यावर वैवाहिक जीवनात काही समस्या असतील. तर एकत्र राहण्यापेक्षा वेगळे राहणे अधिक चांगले आहे. २०१९ मध्ये भावनिकरित्या विभक्त झाल्यानंतर अखेर त्यांनी घ’टस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला आणि या सगळ्या प्रक्रियेला २ वर्ष लागली.