स्वरदाने घडवले रणरागिणीचे साक्षात दर्शन ! “दोन पायांवर घोडा उभा केला आणि तोच अमोल कोल्हे यांनी”…पहा Video

Entertainment
काही दिवसापासून मराठी वाहिन्यांवर ऐतिहासिक मालिकांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अनेक ऐतिहासिक मालिका या सध्या सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी स्वामिनी ही मालिका सुरू होती. मात्र, प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही मालिका बंद करण्यात आली. आता सोनी मराठी वर स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही मालिका नुकतीच सुरू झालेली आहे.
मात्र, त्यांनी अनेक ऑडिशन घेतल्या आणि त्या ऑडिशन मधून स्वरदा ठिगळे हिची यासाठी निवड केली. स्वरदा ठिगळे देखील आता यासाठी प्रचंड मेहनत करत आहे आणि अमोल कोल्हे यांना अजिबात नाराज करत नाही. याबाबत अमोल कोल्हे यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या मध्ये ते स्वरदाचे खुप कौतुक करताना दिसत आहेत.
या मालिकेमध्ये अनेक चित्तथरारक असे सीन आहेत. त्यामध्ये घोड्यांचा वापर देखील खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. अनेकदा असे सीन करण्यासाठी मोठे कलाकार हे डमी वापरतात. मात्र, काही कलाकार हे असे असतात की ते कुठलीही डमी न वापरता आपण आपलाच हा सीन पूर्ण करत असतात. तर या मालिकेतही स्वरदा ठीगळे हिने अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःहून हा सीन चित्रीत केलेला आहे.
याचेच कौतुक अमोल कोल्हे यांनी केले आहे. स्वरदा येणे स्वार असलेला घोडा दोन पायावर उभा करून दाखवण्याचा सीन अतिशय जबरदस्त असा केला आहे. ती कुठेही यासाठी डगमगली नाही, हे विशेष आणि तिने डमी देखील वापरली नाही. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी स्वतःहून तिचे कौतुक केले आहे. या सीनबाबत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे.
यामध्ये ते स्वरदा चे कौतुक करताना म्हणतात की, एक कृती आणि शंकेची जागा ठाम विश्वासाने घेतली. या मालिकेमध्ये ताराराणी यांची भूमिका स्वरदा ठिगळे हिने करावी, असा मी निर्णय घेतलाय मात्र माझ्या मनामध्ये त्या वेळेस खूप मोठी शंका होती की, स्वरदा ही भूमिका लीलया पेलते की नाही. 300 वर्ष जुना इतिहास उपेक्षा, मळभ दूर करण्याचा आव्हान आमच्यासमोर होतं.
म्हणून म्हणूनच एखादी झोकून देऊन काम करणारी अभिनेत्री यासाठी पाहिजे होती. मात्र, स्वरदा हिने ही शंकेची पाल मनातुन काढून टाकली आहे. ती अतिशय जबरदस्त या मालिकेत करत आहे. स्वार घोड्याच्या पाठीवर बसून घोडा दोन पायावर उभा करणे, ही प्रतिमा अनेक चित्र यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी झालेली आहे.
स्वरदा ने घोडा दोन पायांवर लीलया उभा केला आणि डोळ्यासमोर रणरागिणी, स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब उभ्या राहिल्या! डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत. स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता सोनी मराठी वर सध्या सुरु आहे.