‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘या’ अभिनेत्याने त्याच्या वडिलांना वाढदिवशी गिफ्ट केली महागडी कार.

‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘या’ अभिनेत्याने त्याच्या वडिलांना वाढदिवशी गिफ्ट केली महागडी कार.

‘चला हवा येऊ द्या’ ही मालिका महाराष्ट्रातील प्रत्येक घरात सोमवार ते बुधवारी आवर्जून बघितली जाते. पूर्ण परिवार सोबत बसून का कार्यक्रम नक्की पाहत असेल. 6 वर्षपासून चालत आलेला हा कार्यक्रम आज ज्या पद्धतीने लोकप्रिय झाला आहे तो फक्त कार्यक्रमात काम करणार्या कळकरांमुळेच.

या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा भूतकाळ खूप कठीण होता, कधीकाळी हे कलाकार देखील इतर शोसाठी ऑडीशन देत असायचे. ‘फु बाई फु’ या कार्यक्रमात चला हवा येऊ द्या मधील सर्वच कलाकारांनी काम केले आहे. काही कलाकारांचे इतके कठीण दिवस होते की अक्षरशः त्यांचे खायचे वांदे झाले होते.

आपल्यासाठी स्वत:च्या कमाईतून खरेदी केलेलं घर आणि पहिली गाडी नेहमीच खास असते. काही दिवसांपूर्वी निलेश साबळे याने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे, त्यानंतर अकुंर वाढवेनेही नवी कोरी करकरीत चार चाकी गाडी खरेदी केली व हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अंकुरनं त्यांच्या वडिलांच्या वाढदिवशी चारचाकी गाडी घरासमोर उभी केली आहे आणि याचा अत्यंत आनंद असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेच्या निमित्ताने अंकुर घराघरांत पोहोचला. त्यानिमित्ताने त्याच्यातील अभिनयाची कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. मात्र अंकुर चांगला कवीदेखील आहे. आताच ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.

आतापर्यंत विविध नाटकं आणि चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. आपला अभिनय व चिकाटीच्या जोरावर शारिरीक व्यंगावर मात करीत तो इथपर्यंत आला आहे. मिळेल तो रोल तो नेहकी स्वीकारत असतो आणि उत्तम न्याय त्या अभिनयाला मिळवून देत असतो. अंकुरला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *