मुंबईत आला तेव्हा खिश्यात फक्त 6 हजार रुपये होते, असा बनला यशस्वी डायरेक्टर, आज भले भले बॉलीवुड स्टार्स घरासमोर लावतात रांग..

बॉलीवुड मध्ये बरेच असे दिग्दर्शक आहेत की त्यांना फिल्म इंडस्ट्री मध्ये खूप मोठ्या प्रमाणात यश लाभले आहेत. काही काही दिग्दर्शक सुरुवातीला अतिशय हलाखीचे जीवन जगत होते. आज त्यांच्या समोर कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री काम मिळवण्यासाठी रांगेत असतात. नशिबाने देखील काही दिग्दर्शकांचे जीवन भरभरून गेले आहे. असे पण काही दिग्दर्शक आहेत की त्यांना काही काळानंतर फ्लॉप व्हावे लागले.
आज आपण अशा एका दिग्दर्शका बद्धल बोलणार आहोत जे मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत हात अजमवण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची होती. ते त्यावेळी मुंबईत आले तेव्हा त्यांचे खिश्यात अवघे 6000 रुपये होते. आज तेच दिग्दर्शक इतके काही यशस्वी झाले की त्यांचे नाव फिल्म इंडस्ट्रीत अजरामर झाले आहे.
अनुराग मुंबईला आला तेव्हा त्याच्या खिशात 5- ते 6 हजार रुपये होते. तो मुंबई शहरात आला तेव्हा पहिल्या महिन्यांत खूप अस्वस्थ झाला होता. कारण मुंबई सारख्या शहरात येऊन रहाणे त्यांच्यासाठी खूप अवघड होते. त्यातल्या त्यात राहण्याची सोय देखील नव्हती. बाकी खान पिन तर बाजूलाच. यावेळी त्यांना रस्त्यावर झोपावे लागले होते आणि कामाच्या शोधात भटकत राहावे लागले होते.
खूप प्रतीक्षेनंतर त्यांना आशेचा किरण दिसला आणि त्यानंतर त्यांना पृथ्वी थिएटरमध्ये कसेबसे एक कलाकार म्हणून काम मिळाले होते. पण त्यावेळी त्यांना नशिबाने साथ दिली नाही. काम मिळून काही दिवस उलटत नाही तेच एका दिग्दर्शकाचा मृ-त्यू झाला. ही घटना झाल्यामुळे त्यांचे पहिले नाटक आजपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. या गोष्टीचा खेद त्यांना आज देखील होत आहेत. आज ते प्रख्यात दिग्दर्शक आहेत. परंतु ते अजूनही त्यांचे पहिल्या नाटकाला पूर्ण करू शकले नाही. त्यांचेमागे कामाचा व्यापच इतका वाढला आहे की बाकी इतर गोष्टी करण्याकडे त्यांना वेळ देखील देणे मुश्किल होत आहे.
त्यानंतर अनुरागने दिग्दर्शक म्हणून ‘पंच’ हा चित्रपट बनविला होता. पण काही कारणामुळे त्यांचा तो चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झाला नाही. सुरुवातीच्या काळात अशा अनेक घटना घडल्या की ज्यामुळे नशिबाने देखील त्यांची साथ सोडली होती. त्यानंतर 2012 मध्ये आलेल्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटातून अनुरागला खरी ओळख मिळाली. त्यांचा हा चित्रपट खूप चालला.
त्यानंतर नशिबाने त्यांची पाठ थोपटून त्यांना यशाचे शिखरापर्यंत पोहचवले. काही दिवसातच त्यांनी इतके यश मिळवले की त्यांना कोनामागे फिरायची गरज देखील लागली नाही. आज ते इतके मोठे दिग्दर्शक बनले की त्यांचे समोर कामासाठी रांगा लागत आहे. ऑफबीट बॉलिवूड चित्रपटाच्या या दिग्दर्शकाने आतापर्यंत ‘गुलाल’, बॉम्बे टॉकीज, ‘कुरुप’, ‘रमण राघव २.०’ आणि सेक्रेड गेम्स सारख्या सुपरहिट वेब सीरिज प्रेक्षकांना दिल्या आहेत.