मराठी चित्रपटासाठी स्वप्निल जोशी घेतो सर्वाधिक मानधन… नंबर 2 ची अभिनेत्री घेते सर्वात कमी पैसे…

मराठी चित्रपटासाठी स्वप्निल जोशी घेतो सर्वाधिक मानधन… नंबर 2 ची अभिनेत्री घेते सर्वात कमी पैसे…

मराठी कलाकार आणि मालिकांबाबत सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता असते. इतर क्षेत्राप्रमाणेच मराठी कलाकारांना किती मानधन मिळते. याबाबत देखील सर्वसामान्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. मात्र, अशी माहिती फारशी प्रेक्षकांना आणि इतरांना भेटत नसल्याचे पाहायला मिळते. बॉलीवूडमध्ये कलाकारांना प्रचंड मानधन मिळते. मात्र, त्या तुलनेत मराठी चित्रपटसृष्टी व छोटा पडदा यावर मानधन काहीशे कमीच मिळते.

म्हणून मराठीतील कलाकार हे हिंदी चित्रपटात आपले नशीब आजमावत असतात. त्यातून त्यांना थोडेबहुत उत्पन्न देखील होते. मराठीच्या तुलनेत दक्षिणेत मात्र कलाकारांना अधिक मानधन मिळते. त्यामुळे देखील गेल्या काही वर्षात मराठी कलाकार दक्षिणेत काम करण्यात उत्सुक असतात. आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये मराठी कलाकारांना किती मानधन मिळते, याबाबत माहिती सांगणार आहोत.

३. अंकुश चौधरी: अंकुश चौधरी याने आजवर अनेक चित्रपटातून आपली चमक दाखवली आहे. छोट्या पडद्यावर देखील अंकुश चौधरीने काही मालिका केल्या आहेत. अंकुश चौधरी हा एका चित्रपटासाठी 30 लाख रुपये घेतो.

४. सई ताम्हणकर : सई ताम्हणकर आपल्या बिनधास्त अदाकारीने सर्वत्र चर्चेत राहते. अनेक चित्रपटात तिने बोल्ड सीन दिले आहेत. सई ताम्हणकर एका चित्रपटासाठी वीस लाख रुपये मानधन आकारते.

५. स्वप्निल जोशी : स्वप्निल जोशी हा बालपणापासूनच मालिका व चित्रपटातून दिसतो. आजच्या घडीचा मराठीतील तो सुपरस्टार असेच म्हणावे लागेल. स्वप्नील जोशी एका चित्रपटासाठी तब्बल पन्नास लाख रुपये आकारत असल्याचे सांगण्यात आले.

६.सोनाली कुलकर्णी (सीनियर) : सोनाली कुलकर्णी हिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. हिंदीमध्ये तिचा दिल चाहता है हा चित्रपट प्रचंड गाजला होता. सोनाली सध्या फारशी अॅक्टीव्व नसली तरी एका चित्रपटासाठी ती 18 लाख रुपये आकारते.

७.सोनाली कुलकर्णी (जुनियर): सोनाली कुलकर्णी हिने नटरंग या चित्रपटातून मराठी चित्रपटात चार चाँद लावले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले आहे. सोनाली कुलकर्णी ही एका चित्रपटासाठी 12 लाख रुपये आकारते.

८. प्रिया बापट : प्रिया बापट हिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली.तिने मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये देखील काम केले. ती एका चित्रपटासाठी नऊ लाख रुपये घेते.

९.उमेश कामत : उमेश कामत याने या चित्रपटातून काम केले आहे. सध्या मराठी मालिका व नाटक यात देखील तो काम करतो. उमेश कामत एका चित्रपटासाठी 11 लाख रुपये आकारतो.

१०. सुबोध भावे: सुबोध भावे याने अनेक मराठी चित्रपट व मालिकांतून काम केले आहे. तुला पाहते रे ही मालिका त्याची प्रचंड गाजलेली आहे. सुबोध भावे एका चित्रपटासाठी केवळ दहा लाख रुपये आकारत असल्याचे सांगण्यात येते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *