Video : अरबाजच्या ‘गर्लफ्रेंडने’ अरबाजसोबतचा ‘असे’ काम करतानाचा व्हिडिओ केला शेअर..!

सध्या लाॅकडाऊनमुळे जो तो आपल्या घरात अडकून आहे. केवळ आवश्यक सेवा देणारे लोकच घराबाहेर पडून काम करत आहेत. अशा वेळेस बॉलीवूड कलाकार देखील आपल्या घरात आहेत. अनेक जण आपल्या परीने गरजूंना मदत देखील करत आहेत. तर अनेक कलाकार हे घरी बसून आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत.
अभिनेता अरबाज खान देखील सध्या मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी त्याच्यासोबत आहे. ती त्याची संपूर्ण काळजी घेत आहे. दोघे अतिशय आनंदात वेळ घालवत आहेत. काही महिन्यापूर्वी अरबाज खानने पत्नी मलायका अरोरा हिला घटस्फोट दिला आहे. त्यानंतर मलायका देखील अर्जुन कपूर याच्यासोबत राहत आहे. दोघे देखील अतिशय मजेत वेळ घालवत आहेत.
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी अनेक वर्ष संसार केला. त्यांना मुलं देखील आहेत. मात्र, गेल्यावर्षी त्यांच्या संसारात विघ्न आले. त्यामुळे दोघेही वेगळे राहू लागले. मलायकाने तिच्यापेक्षा लहान असलेल्या अर्जुन कपूर याच्यासोबत राहणे पसंत केले, तर अरबाज खान काही दिवस एकटाच राहत होता. त्यानंतर त्याला इटालियन अभिनेत्री, मॉडेल जॉर्जिया यांची साथ मिळाली. दोघेही आता सोबतच राहात आहेत. मात्र, दोघे लग्न करणार की नाही ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे.
जॉर्जिया 22 वर्षांनी आहे लहान
अरबाज खानची नवीन गर्लफ्रेंड जॉर्जिया त्याच्यापेक्षा तब्बल बावीस वर्षांनी लहान आहे. तिचे वय 31 वर्ष आहे तर अरबाज खान सध्या 52 वर्षाचा आहे. मात्र, ते म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. असेच काहीसे समीकरण अरबाज आणि जॉर्जिया यांच्या बाबतीत लागू आहे.