‘लॉकडाऊनमुळे’ आपल्या ‘सात’ महिन्यांच्या बाळासह कर्जतमध्ये अडकला आहे हा अभिनेता, त्याची ‘अशी’ अवस्था झाली आहे की….

चीनमधून उत्पन्न झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आता भारतातही कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रादुर्भाव होताना दिसत आहे. जगभरात आतापर्यंत 10 लाख लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे तर 45 हजार लोकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही आतापर्यंत 2300 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे आणि त्यापैकी 56 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.
आपल्या देशात व्हायरसचा जास्त फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे लोकांना नाईलाजाने घरातच राहावे लागत आहे. म्हणून सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. त्यात काहीजण कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे त्यांना आहे त्याच ठिकाणी रहावं लागत आहे.
या व्हिडिओमध्ये अर्जुनची दाढी वाढलेली असल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यावर अर्जुनने सांगितले आहे की, माझी ही अवस्था पाहून मी साधू बनलो आहे का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल… पण आता कोरोना व्हायरसमुळे सगळ्यांवरच एखाद्या साधुसारखे जीवन जगण्याची वेळ आली आहे.
देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर कुठेही न जाता एकाच ठिकाणी थांबावे असा निर्णय मी घेतला आणि गेल्या काही दिवसांपासून मी इथेच राहात आहे. येथील वातावरण खूपच चांगले असून मी माझ्या कुटुंबियांसोबत येथे राहात आहे. तुम्ही देखील तुमच्या कुटुंबियांसोबत खूप चांगला वेळ घालवत असाल अशीच मी आशा करेन.
कर्जतमध्ये अर्जुन सोबत त्याची प्रेयसी गैब्रिएला आणि सात महिन्यांच्या मुल आहे, अर्जुन त्यांच्यासोबत खूप चांगला वेळ घालवत आहे.