या एका वाईट सवयीमुळे ‘अरुण गोविल’ यांना ‘राम’च्या भूमिकेसाठी रिजेक्ट केले होते……

आता पुन्हा रामायण हि पौराणिक मालिका दूरदर्शनवर सुरु झाल्यामुळे त्यामधील सर्व पात्र पुन्हा एकदा आपल्या समोर आले आहेत. पुन्हा एकदा 90 दशकातील मुलानं त्यांचं बालपण अनुभवयला मिळणार आहे, आणि ज्यांनी दूरदर्शनवर हि मालिका पहिली नव्हती त्यांच्यासाठी हि एक पर्वणीच असेल. पण तुम्हला माहीत आहे का? रामाची भूमिका सरणारे अरुण गोविल यांना या भूमिकेसाठी आधी रिजेक्ट करण्यात आलं होत. पण त्यांना हि भूमिका परत मिळवण्यासाठी खूप काही गोष्टींचा त्याग करावा लागला. आपण आज त्याबद्दल बोलणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
पौराणिक टीव्ही सीरियल ‘रामायण’ मध्ये रामची भूमिका साकारणारे ‘अरुण गोविल’आजही लोकांच्या मनात त्यांची रामची प्रतिमा डागाळलेली नाही. हिंदी, भोजपुरी, तेलगू, उडिया अशा अनेक भाषांमध्ये चित्रपट करणारे अरुण गेल्या काही काळापासून चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रापासून खूप लांब आहेत. अरुण गोविलचा जन्म उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे झाला आहे.
मेरठ महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना अभिनयात करिअर करण्याचे वेड लागले होते. त्यानंतर ते मुंबईला आले होते. टीव्हीवरील रामची अभिनय कारकीर्द आता संपली असेल, पण आजही अरुण गोविल लोकांच्या हृदयात एका देवासारखे स्थान करून आहेत. अरुणचा पहिला चित्रपट ‘पहेली’ होता जो 1977 मध्ये आला होता.
तेव्हापासून अरुण गोविल यांनी सिगारेटला स्पर्शही केला नाही. अरुण गोविल बर्याच वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. अरुण गोविल आता त्याची प्रॉडक्शन कंपनी चालवत आहे. टीव्ही मालिका ‘मशाल’ त्याच्या निर्मितीत तयार झाली होती. तसेच त्यांची निर्मिती कंपनी दूरदर्शन वाहिनीसाठी कार्यक्रम तयार करते. काम न करण्याबद्दल अरुण गोविल म्हणाले की, रामायणानंतर त्यांना कधीच चांगली भूमिका मिळाली नाही.
परिणामी त्याची अभिनय कारकीर्द संपुष्टात आली. त्यांना याबद्दल वाईट वाटते. जरी ‘रामायण’ टीव्हीवर जवळपास तीन दशकांपासून प्रसारित होत नसले तरीही अरुण गोविल अजूनही टीव्हीचा राम म्हणून ओळखले जातात.
अरुण गोविल यांनी सांगितले की आताही अनेक ठिकाणी लोक त्यांना पाहून हात जोडतात. अरुण गोविल यांचा असा विश्वास आहे की राम झाल्याने त्याला मिळालेले यश इतर कोणत्याही टीव्ही मालिका किंवा चित्रपटाद्वारे मिळवता आले नसते. अरुण गोविल शेवटी भोजपुरी चित्रपट ‘बाबुल प्यारे’ मध्ये दिसले होते.