आशा भोसले यांच्यासोबत असलेली मुलगी आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ही?

आशा भोसले यांच्यासोबत असलेली मुलगी आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ही?

सोशल मीडियामूळे सेलेब्रिटी आणि चाहत्यांचे अंतर अगदी कमी झाले आहे. आणि बॉलिवूडमधील कलाकारही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते सोशल मीडियामार्फत त्यांचे खाजगी फोटो शेअर करत असतात. त्यांच्या हॉलिडेचे, लहानपणीचे, कुटुंबियांचे फोटो त्यांच्या फॅन्ससाठी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूडचे सेलेब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत होते. त्यात आता आशा भोसलेंसोबत अजून एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो कुणी शेअर केला आणि फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आहे तरी कोण ते आपण जाणून घेणार आहोत.

या फोटोत श्रुतीला ओळखणे देखील कठीण जात आहे. या फोटोत श्रुती गात असताना आशा भोसले अतिशय शांतपणे गाणे ऐकत असताना आपल्याला दिसत आहेत. हा फोटो श्रुतीच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

श्रुती एक खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली गायिका असल्याचे तिने सिद्ध केले आहे. 2008 मध्ये ‘लक’ या बॉलिवूड चित्रपटातून श्रुतीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर 2011 मध्ये तेलगू इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. हा सिनेमाही आपटला.

पण यानंतर तिने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. श्रुती प्रसिद्ध अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री सारीका यांची मोठी मुलगी आहे. आणि तिला एक बहीण देखील आहे. श्रुतीने बॉलिवूड मध्येदेखील अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *