सलमानची ‘बेवफा सनम’ मधील ‘चांदनी’ आठवते का? आता दिसते अशी.

सलमानची ‘बेवफा सनम’ मधील ‘चांदनी’ आठवते का? आता दिसते अशी.

सलमान खानचा बेवफा सनम चित्रपट तुम्ही पाहिला असेल या चित्रपटात सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री चांदणी तुम्हाला आठवत असेल. तिचा हा पहिलाच चित्रपट होता आणि हा सिनेमा सुपरहिट झाला होता. पण त्यानंतर चांदणीने एकही हिट चित्रपट दिला नाही एकामागोमाग एक तिचे सगळे चित्रपट फ्लॉप ठरले. आणि त्यानंतर ती अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. तिने 1991 ते 1996 या काळात एकूण 10 सिनेमे केले होते पण ही चांदणी आज कुठे आणि कशी दिसते हे तुम्हाला माहिती आहे ?

चांदणी सध्या विदेशात असून तिथे ती डान्स इन्स्टिट्यूट चालवता आहे. चांदणीचे खरे नाव ‘नवदिता शर्मा’ असून तिने फक्त बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिचे नाव चांदणी असे नामकरण केले होते. चांदनी सध्या अमेरिकेत रहात असून ती आॅरलॉडो शहरात डान्स क्लास चालवत आहे.

चांदणीला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड होती, त्यामुळे तिने लहानपणापासूनच नृत्य शिकायला सुरुवात केली. आणि तिला नृत्यामध्ये करियर करायची इच्छा होती, पण आपण बॉलिवूडमध्ये येऊ असा विचार तिने कधीच केला नव्हता. पण तरी देखील ती केवळ सतरा वर्षाची असताना तिला सलमान सोबत ‘सनम बेवफा’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

चांदणीचे लग्न झाले असून तिला दोन मुली आहेत. चांदणी आज बॉलीवूड पासून लांब असली तरीही बॉलीवूडवरील तिचे प्रेम थोडे देखील कमी झाले नाही. तिला दोन मुली आहेत आणि त्यांचे नाव तिने करिश्मा आणि करीना असे ठेवले आहे, यावरून तिचे बॉलीवूडवरील प्रेम दिसून येते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *