साथ निभाना साथिया मधील तुमची साधी भोळी दिसणारी गोपी बहू आता दिसते बो-ल्ड आणि ग्लॅ-मरस, फोटो पाहून चकित व्हाल

सोशल मीडिया एक अशी जागा आहे जिथे प्रत्येक दिवशी काही ना काही व्हायरल होत असते. आजकाल साथ निभाना साथियाच्या कोकिला बेह्नच्या रसडो में कौन था या डायलॉग ची रॅप सोशल मीडियावर सध्या चांगलीच गाजत आहे. या व्हिडिओमुळे गोपी बहू म्हणजेच गिया मानेक आणि कोकिला बेन म्हणजे रुपल पटेल पुन्हा एकदा प्रसिद्ध झाल्या आहेत.
या सीरियलमध्ये गियाने साधी भोळी अशिक्षित सूनेची भूमिका साकारली जी खूप प्रसिद्ध होती. कोकिलाबेनची रॅप इतकी लोकप्रिय झाली की निर्मात्यांनी पुन्हा हा कार्यक्रम आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टीव्ही अभिनेत्री गिया मानेक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच साथ निभाना साथिया 2 चा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दर्शकांना हा प्रोमो खूप आवडत आहे आणि तो पुन्हा सुरू होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
या मालिकेत तिने गोपी बहु नावाच्या अतिशय साधी भोळी असणाऱ्या सुनेची व्यक्तिरेखा साकारली होती. २०१० ते २०१२ या काळात तिने मालिकेत काम केले पण त्यानंतर झलक दिख ला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी तिने ही मालिका सोडली. तिच्या मालिका सोडल्यावरून काही वाद देखील झाला होता. यानंतर गीया ही बालिका वधू, न बोले तुम न मैंने कुछ कहा, जिनी और जूज, अजब गजब घर जमाई, बड़ी दूर से आए हैं आणि मनमोहिनी सारख्या मालिकांमध्ये ती दिसली आहे.
गियाने कोणताही कायदा मोडला नाही, होय एकदा ती तिच्या आई आणि मित्रांसमवेत एका हु क्का रेस्टॉरंटमध्ये गेली असता तिथे पोलिसांची रे ड पडली होती त्याचदरम्यान पोलिसांनी तिला पकडले. मात्र, गियाने तेथे कोणतेही ड्र*ग्स घेतले नव्हते म्हणून तिला सोडण्यात आले.