सुशांत सिंग राजपूतच्या नि धनानंतर अशी झालीय अंकिता लोखंडेची ‘अवस्था’, जवळच्याच व्यक्तीने केला खुलासा

सुशांत सिंह राजपूत याच्या नि धनानंतर त्याच्या जाण्याबाबत अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या प्रकरणी जवळपास 28 जणांची चौकशी केली आहे. यात त्याची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे, रिया चक्रवर्ती यांचा देखील समावेश आहे. तसेच त्याच्यासोबत शेवटच्या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री संजना सिंघवी हिचा देखील समावेश आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या नि धनाचा त्याचे मित्र, कुटूंब आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या निधनाच्या अनेक दिवसानंतरही त्याला मिस केले जाते आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंट अंकिता लोखंडे दु:खात आहे. अंकिता सुशांतच्या कुटुंबीयांसुद्धा भेटायला गेली होती. अंकिता लोखंडे हिच्यासोबत त्याचे प्रेमप्रकरण होते. काही वर्ष ते सोबत राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते.
जबाब नोंदवण्यासाठी संजय लीला भन्साळी आज वांद्रे पोलिस ठाण्यात गेले होते
चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठवून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले होते. भन्साळी यांना पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तीची चौकशी पोलीस करत आहेत.
त्यांच्या दबावातून संजय लीला भन्साळीच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटातून सुशांतला रिप्लेस करत त्याजागी रणवीर सिंगला लीड रोल देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार याप्रकरणी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे पोलीस चौकशी करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.