रामायणाचे शिल्पकार ‘रामानंद सागर’ यांच्याशी स्वप्निल जोशीची ‘अशी’ झाली होती पहिली भेट

रामायणाचे शिल्पकार ‘रामानंद सागर’ यांच्याशी स्वप्निल जोशीची ‘अशी’ झाली होती पहिली भेट

उत्तर रामायणातील कुश ची आजही प्रेक्षकांवर भुरळ।कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सहाजिकच सर्वजण घरात बसलेले आहेत. अनेकांना सध्या काय करावे, असा प्रश्न पडत आहे. ही बाब हेरूनच दूरदर्शन या सरकारी वाहिनीने अनेक जुन्या मालिका सुरू केल्या आहेत.

यात महाभारत, रामायण, कृष्ण, शक्तिमान, चाणक्य यांचा समावेश आहे. या मालिका टेलिकास्ट होताना सर्वांना आपला जुना काळ आठवत आहे. महाभारत या मालिकेला तेवढाच आजही प्रतिसाद मिळत आहे, जेवढा की या आधी मिळाला होता.

अशी झाली होती पहिली भेट

उत्तर रामायण ज्यावेळी सुरू करण्यात येत होते. त्यावेळी देशभरातून हजारो मुलांच्या ऑडिशन घेण्यात आल्या होत्या. मात्र, यात केवळ स्वप्निल जोशी आणि मयुरेश शेत्रमाडे यांची निवड अनुक्रमे लव आणि कुश या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.

यात स्वप्निल जोशी याने कुशची भूमिका साकारली होती. ती भूमिका त्या वेळी खूप गाजली होती. आज देखील ही भूमिका पाहताना आपला जुना काळ आठवतो. हीच बाब हेरून स्वप्निल जोशी याने आपल्या यूट्यूब चॅनलवरून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. रामानंद सागर यांच्याशी आपली पहिली भेट मढ आयर्लंड येथे झाली होती.

ही भेट त्याला वडिलांनी घडवून आणली होती. पहिल्याच भेटीत रामानंद सागर स्वप्निल सोबत झालेल्या चर्चेनंतर प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांनी कुशच्या भूमिकेसाठी स्वप्निल जोशी याची निवड केली होती. ही भेट झाल्यानंतर स्वप्नीलचे वडील आनंदी झाले होते.

त्यानंतर घरी परतताना त्यांनी स्वप्नीलला आइस्क्रीम खाऊ घातले. या भूमिकेवेळी स्वप्निल जोशीचे वय केवळ नऊ वर्ष होते. त्यानंतर स्वप्नील याने कधीही मागे वळून पाहिले नाही.

उत्तर रामायण ते आघाडीचा अभिनेता

उत्तर रामायणमधून स्वप्नीलने ही भूमिका साकारून टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
काही मालिका केल्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीत त्याने अनेक चित्रपट केले. यात दुनियादारी हा काही वर्षांपूर्वी आलेला चित्रपट प्रचंड गाजला होता.

तसेच एका लग्नाची दुसरी गोष्ट, मुंबई-पुणे-मुंबई अशा चित्रपटसोबत इतर मालिकेमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. सध्या वेबसिरीसमध्ये देखील स्वप्निल धमाका करताना दिसत आहे. समांतर ही वेबसिरीस सध्या चांगलीच गाजत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.