‘तारक मेहता का उलटा चश्मा’ला बबिताने ठोकला राम-राम ? 2 महिण्यापासून शुटिंगला होती गैरहजर….

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ला बबिताने ठोकला राम-राम ? 2 महिण्यापासून शुटिंगला होती गैरहजर….

माघील जवळपास दोन दशकांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. साता-समुद्रपार देखील या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. सर्वात जास्त कालावधीसाठी चालणारी मालिका म्हणून मोठा विक्रम देखील या मालिकेच्या नावे नोंदवला गेला आहे.

रोजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या आयुष्यामध्ये ही मालिका बघून काही काळ का होईना, प्रेक्षक आपला ताण बाजूला ठेवून खळखळून हसावे असाच प्रयत्न या मालिकेच्या मेकर्सचा असतो. त्यासाठी मेकर्स आणि कलाकार कोणतीही कसर ठेवत नाही आणि म्हणून आजदेखील ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावरच आहे.

या मालिकेतील सर्व पात्र देखील तेवढेच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. जेठालाल पासून बग्गा आणि दयाबेन पासून बबिताजी या सर्वच पात्रांचा वेगळा असा मोठा चाहतावर्ग आहे. खास करून जेठालाल आणि बबिता या हटके जोडीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. जेठालालचे आणि बबिताजीचे हटके मैत्रीचे नाते सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.

बऱ्याच लोकांना हे नाते आपल्या जवळचे देखील वाटते, म्हणून या जोडीचा वेगळा फॅनवर्ग आहे. सर्वात हॉ’ट आणि बो’ल्ड अश्या बबिता म्हणजेच मुनमुन दत्त यांचा भलामोठा चाहतावर्ग आहे.केवळ त्यांनाच बघण्यासाठी, अनेक चाहते मालिका पाहतात असं अनेकांनी मान्य केलं आहे. त्यामुळे या मालिकेच्या टीआरपीमध्ये बबिताचा देखील मोठा वाटा आहे.

मात्र माघील काही दिवसांपासून मुनमुन वा’दाच्या भोवऱ्यात अड’कली आहे. जा’तीवा’दी व’क्तव्य केल्यामुळे तिच्यावि’रोधात गु’न्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच के’समध्ये तिला जे’लमध्ये देखील जावे लागले होते. मात्र त्याचबरोबर, माघील बऱ्याच दिवसांपासून ती तारक मेहताच्या सेटवर देखील गैरहजर आहे.

मालिकेचं शुटींग सुरू आहे, मात्र शुटींगच्या दरम्यान मुनमुन म्हणजेच बबिता कुठेच बघायला मिळत नाहीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शूटिंगला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे इतर मालिकांप्रमाणे तारक मेहताच्या मेकर्सने देखील आपली शूटिंग दमनला हलविली होती. आता शूटिंगची परवानगी मिळाली असल्यामुळे, पुन्हा मुंबईला शूटिंग सुरु झाली आहे.

आता जवळपास एक महिन्यापासून शूटिंग मुंबईला सुरु आहे मात्र, यामध्ये बबिता म्हणजेच मुनमुनची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवत आहे. त्याचबरोबर, मेकर्स मालिकेचे कथानक तिचे पात्र वगळून लिहत असल्यामुळे आता नक्की या मालिकेमध्ये पुढे बबिता दिसणार कि नाही याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान मेकर्सने याबद्दल कोणतेही विधान केले नाहीये आणि मुनमुनकडून सुद्धा कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाहीये. मात्र अजून काही दिवस तरी, प्रेक्षकांना आपल्या आवडत्या जेठालाल आणि बबिताच्या जोडीला पुन्हा एकत्र बघण्यासाठी वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *