बच्चन कुटुंबाची सून होण्यापूर्वी करिश्मा कपूरनं ठेवली होती ‘ही’ अट, अभिषेकनं मोडला साखरपुडा !

बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर 25 जून रोजी 46 वा वाढदिवस साजरा करणार आहे. 90 च्या दशकात करिश्मा टॉप अॅक्ट्रेस पैकी एक आणि खूप फेमस होती. एक वेळ अशी होती की, जेव्हा अभिषेक आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता.
हे साल होतं 2002. करिश्मा बच्चन कुटुंबियांची सून होणार होती. दोन्ही कुटुंब आनंदात होते. अशात करिश्मानं अभिषेकसमोर एक अट ठेवली आणि सारं काही संपलं. 2003 मध्ये हा साखरपुडा मोडला. नेमकी ती काय अट होती आणि त्या काळी काय झालं हे आपण जाणून घेऊयात.
काहीही झालं तरी कुटुंबापासून वेगळं राहणं अभिषेकला मान्य नव्हतं. त्यानं करिश्माला खूप समजावलं. परंतु करिश्मा काहीच ऐकायला तयार नव्हती. अभिषेकचं आईवडिलांवर खूप प्रेम आहे. म्हणून हे नातं तोडणंच त्याला योग्य वाटलं. त्यानं करिश्माची अट मानण्यास नकार दिला आणि हे नातं तोडून टाकलं.”
29 सप्टेंबर 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूरसोबत लग्न केलं. या दोघांना मुलं आहेत. मुलीचं नाव समाइरा आणि मुलाचं नाव किआन आहे. 2014 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. 2016 मध्ये दोघेही वेगळे झाले. सध्या ती तिचा कथित प्रियकर बिजनेसमन संदीप तोषनीवालसोबत नात्यात आहे.