बजरंगी भाईजान मधील मुन्नी आठवते का.? 5 वर्षात झालाय खूप मोठा बदल, आता दिसते ‘अशी’

सलमान खानचा बजरंगी भाईजान या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली हर्षाली मल्होत्रा नुकतीच १२ वर्षांची झाली. सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने तिने तिचा वाढदिवस अतिशय साधेपणाने घरातच साजरा केला. हर्षालीने इन्टाग्रामवर तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
बजरंगी भाईजान या चित्रपटात तिची मुख्य भूमिका होत. चित्रपटात न बोलताही प्रेक्षकांना तिचा अभिनय अतिशय आवडला होता. तिचा निरागसपणा प्रेक्षकांच्या मनात जागा करून गेला. आजही तिची मुन्नी म्हणूनच ओळख इंडस्ट्रीमध्ये आहे.
हर्षालीने याआधी ‘कुबूल है’, ‘लौट आओ त्रिशा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. हर्षालीने चित्रपट आणि मालिकांसोबतच काही जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.