बसमध्ये बसलेल्या क्रिकेटपटू समोरच ‘या’ महिला क्रिकेटरने केली होती लघुशंका..

क्रिकेट म्हणजे इंग्लंडचा पारंपारिक खेळ. त्यातही अॅशेस मालिका म्हणजे त्यांचा जीव की प्राण. गेल्या अनेक वर्षापासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान ही मालिका खेळवण्यात येते. यात कधी इंग्लंड बाजी मारतो, तर कधी ऑस्ट्रेलिया बाजी मारतो. ही मालिका सातत्याने घेण्यात येते. ही मालिका इंग्लंडसाठी करो की मरो अशी असते. पंधरा वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग नुकताच उघडकीस आला आहे.
2005 मध्ये महिला आणि पुरुष यांच्यातील अॅशेस मालिका एकाच वेळेस खेळवण्यात आली होती. यामध्ये 42 वर्षानंतर महिला क्रिकेटपटूंनी ही मालिका जिंकली होती. त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला नामोहरम केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया खेळाडू चांगलेच निराश झाले होते. तर दुसरीकडे इंग्लंडच्या महिला आणि पुरुष खेळाडूनी खूपच सेलिब्रेशन केले होते. या विजयानंतर ब्रिटनच्या रस्त्यावरून मोठी रॅली काढण्यात आली होती.
इशा म्हणाली, त्या दिवशी ते सेलिब्रेशन एका रॉक कॉन्सर्टप्रमाणे वाटत होते. रस्त्यावर लोकांनी गर्दी केली होती. लोक आपल्या घराच्या छतावर आणि खिडक्यांवर आमचे नाव घेत होते. आम्ही बीअर पिऊन खूप मज्जा करत होतो.
यादरम्यान आम्ही शँपेन पीत होतो. हे सर्व करून आम्हाला एक तास झाला होता. परंतु तेव्हाच मला बाथरूमला जायचे होते. मी स्वतःला नियंत्रित करू शकले नाही. मी पाहिले की, केविन पीटरसन बस थांबवून जवळच्या एका दुकानामध्ये बाथरूमला गेला होता. परंतु मला तसे करता आले नाही. मला सांगण्यात आले की, तुला ट्राफाल्गर स्क्वायरपर्यंत वाट पहावी लागेल. ती जागा येण्यासाठी २० ते ३० मिनिटं लागणार होती.
त्यामुळे माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. मी त्यावेळी बसच्या छतावरून खाली गेले आणि तेव्हा तिथे कोणीही नव्हते. मी एक कप घेतला आणि त्यामध्येच लघुशंका केली होती. यानंतर मी पुन्हा सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली,” असेही ईशाने सांगितले.
मूळ भारतीय आहे ईशा
ईशा गुहा भारतीय मुळ असणारी क्रिकेटपटू आहे. ती इंग्लंडच्या महिला संघाकडून खेळणारी पहिली ब्रिटीश आशियाई खेळाडू आहे. तिने २०१२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या ती समालोचन करते.