भाग्यश्रीला जबरदस्ती ‘किस’ करण्यास सांगत होता फोटोग्राफर, त्यानंतर सलमान खानने पाहा काय केले !

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने जवळपास गेल्या पंचवीस वर्षापासून बॉलिवूडमध्ये काम करून सर्वांची मने जिंकली आहेत. त्यामुळे सध्या सलमान खान त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकला आहे. त्याच्यासोबत त्याचे पूर्ण कुटुंब देखील आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस देखील त्याच्यासोबत अडकली आहे.
काही दिवसांपूर्वी दोघांनी मुक्तहस्ताने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये जाकलिनसोबत तो मौज मस्ती करताना दिसला होता. सलमान खान याने बॉलीवुडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. तसेच अभिनय क्षेत्राप्रमाणे तो समाजकार्यात देखील खूप अग्रेसर असतो. बीईंग ह्यूमन नावाची त्याची संस्था गरिबांना मदत करते.
सलमान खान याचा 1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन दिसली होती. मात्र, तिचे नाव भाग्यश्री म्हणून सर्वांना माहिती आहे. भाग्यश्री ही सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यातील मुलगी आहे.
हा चित्रपट झाल्यानंतर भाग्यश्रीने हिमालय दासानी याच्यासोबत लग्न केले. मैने प्यार किया हा चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला होता. या चित्रपटानंतर भाग्यश्रीने काही चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने बॉलिवूडपासून दोन हात लांब राहणेच पसंत केले. भाग्यश्रीला दोन मुले असून ते देखील बॉलिवूडमध्ये येण्याच्या तयारीत आहेत.
नुकतीच भाग्यश्रीने एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत तिने सांगितले की, आपण तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर सध्या चित्रपट करत आहोत. मुलाखतीत बोलता बोलता तिने मैने प्यार किया चित्रपटातील एक प्रसंग देखील सांगितला आहे. मैने प्यार किया चित्रपटवेळी एका फोटोग्राफरने सलमान खान याला भाग्यश्रीला किस करण्यास सांगितले होते.
फोटोग्राफरला दोघांचे हॉट फोटो शूट करायचे होते. मात्र, त्यानंतर सलमान खान याने फोटोग्राफरला चांगलेच सुनावले. त्यानंतर त्याने फोटोग्राफरला असे सांगितले की, याबाबत भाग्यश्रीने परवानगी दिली तरच मी असे काही करेल.
मात्र, सलमान याने असे काहीही केलं नाही. त्यामुळे भाग्यश्रीला खूप धीर मिळाला. तो सीन सलमान खान पूर्ण केला. मात्र त्या सीनमध्ये त्याने किस केले नाही.
सलमानचा करियरमध्ये एकदाही किस नाही
सलमान खान याने बॉलीवूड ला खूप चित्रपट दिले आहेत. सध्याचे अभिनेता-अभिनेत्री चुंबन दृश्य देतांना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, अभिनेता सलमान खान याने कधीही उभ्या आयुष्यामध्ये किसिंग सीन दिला नाही.
त्यामुळे देखील त्याची खूप चर्चा होते. एकही किसिंग सीन न देता चित्रपट कसा करायचा आहे, याचा आदर्श सलमान खानकडून घ्यावा असे अनेक अभिनेत्यांनी वैयक्तिकरित्या सांगितले आहे..