भाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन

दूरचित्रवाणीवर गेल्या अनेक वर्षापासून मनोरंजनात्मक कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपला जम बसवत आहेत. काही वर्षांपूर्वी झी मराठीवर घडलंय बिघडलंय ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत जितेंद्र जोशी यांनी अतिशय दर्जेदार काम करून सर्वांचे मनोरंजन केले होते.
तसेच गेल्या काही वर्षात कॉमेडी शो देखील मोठ्या प्रमाणात विविध वाहिनीवर सुरू असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यातील काही कार्यक्रमांना यश मिळते आहे. गेल्या काही वर्षापासून चला हवा येऊ द्या ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील कलाकार अतिशय आपलातुन काम करत असल्याने प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर घेतले आहे.
२. सागर कारंडे : अफलातून टायमिंग असणारा हा अभिनेता सर्वांनाच प्रचंड आवडतो. त्यांनी साकारलेला रामदास आठवले तर सर्वांना अतिशय भावून जातो. चला हवा येऊ द्याच्या एका भागासाठी सागर हा तब्बल ७० हजार रुपये मानधन घेतो.
३.श्रेया बुगडे : ही मराठीतील अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री असून चला हवा येऊ द्या या मालिकेत विविध पात्र साकारते. तिच्या हजरजबाबीपणाची सर्वांनी दखल घेतली आहे. श्रेया एका एपिसोडसाठी तब्बल 80 हजार रुपये मानधन घेते.
४. भाऊ कदम : भाऊ कदम हे मराठी चित्रपट सृष्टी व मालिकांमधील आघाडीचे नाव आहे. भाऊ कदम यांनी आजवर आणि चित्रपटात देखील काम केले आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने ते सर्वांना मोहून टाकतात. चला हवा येऊ द्यामध्ये देखील त्यांचे असेच उत्कृष्ट काम असते. भाऊ कदम चला हवा येऊ द्याच्या एका एपिसोडसाठी तब्बल 80 हजार रुपये मानधन घेतात.
५. भरत गणेशपुरे : भरत गणेशपुरे हे मूळ वैदर्भीय असून वैदर्भीय बोली भाषेमुळे ते चांगलेच चर्चेत राहतात. भरत यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. निशाणी डावा अंगठा या चित्रपटात त्यांच्या अफलातून कॉमेडीने सर्वांना चकित केले होते. भरत गणेशपुरे चला हवा येऊ द्याच्या एका भागासाठी तब्बल ७५ हजार रुपये मानधन घेतात.
तसेच चला हवा येऊ द्याच्या एखाद्या भागात अभिनेत्याने साडी नेसली असेल तर त्याला त्याचे वेगळे पाच हजार रुपये मानधन मिळते, असेही सांगण्यात आले आहे.