पानटपरी चालक ते महाराष्ट्राचा हास्य सम्राट.. ‘असा’ आहे भाऊ कदम यांच्या जीवनाचा प्रवास…

भालचंद्र पांडुरंग कदम म्हणजेच भाऊ कदम यांचा जन्म १२ जून १९७२ मध्ये झाला. भाऊ कदम यांचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत.
वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. भाऊ कदम हे घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम करत होते. पण त्यात भागत नसल्याने त्यांनी भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली.
हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले. भाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल मराठी चित्रपट सृष्टीतील बऱ्याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव ‘फू बाई फू’साठी सुचवले. मात्र, सलग दोनदा भाऊंनी ‘फू बाई फू’ची ऑफर नाकारली.
लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र, तिसऱ्यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले.
झी मराठी वाहिनीवर झालेल्या ‘फू बाई फू’ नावाच्या मराठी विनोदी कार्यक्रमातील आपल्या स्किट्ससाठी ते प्रसिद्ध आहेत. चला हवा येऊ द्या, या झी मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या दुसऱ्या एका विनोदी कार्यक्रमात त्यांनी निलेश साबळे यांच्याबरोबर मुख्य भूमिका देखील बजावली आहे.
या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे भूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत भाऊ आपल्या अचूक टायमिंगसाठी अद्वितीय आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील भोळेभाबडे हावभाव हे त्यांचे वेगळेपण आहे.
या कार्यक्रमाने ३०० यशस्वी भाग पूर्ण केले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक भागामध्ये भाऊ कदम यांनी अभिनय केला आहे. विनोद करताना त्यांच्या निरागसतेने लाखो मराठी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
त्यांनी तुझ माझे जमेना नावाच्या एका कार्यक्रमामध्ये काम केले आणि याचे सादरीकरण करत त्यांनी जवळजवळ प्रत्येक झी मराठी पुरस्कार समारोह कार्यक्रमात भाग घेतला आहे.
भाऊ कदम यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. यात टाईमपास, सांगतो ऐका, मिस्मॅच, पुणे विरुद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, मस्त चाललंय आमचं, बाळकडू यासह इतर चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी फरारी की सवारी या हिंदी चित्रपटात देखील अभिनय केला आहे.