चित्रीकरणापासून लांब असल्यामुळे ही अभिनेत्री चक्क ‘आईसोबत’ करत आहे शेती.., पिकवत आहे….

आधुनिक युगामध्ये रोजची धावपळ, पुढे जाण्याची तीव्र स्पर्धा, तंत्रज्ञानाचा बेसुमार वापर, सातत्याने जीवनशैलीमध्ये होणारे बदल व या बदलांना अंगीकारण्यासाठीची माणसाची जीवघेणी धडपड या सर्वांमध्ये चार क्षण हे निवांत पणाचे केवळ स्वतःला अनुभवण्याचे मिळावेत अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते, मात्र कार्यालयामधील काम, शाळा-कॉलेजेस यामुळे अशा सुट्ट्या मिळणे हे नेहमीच दुरापास्त असते.
मात्र आज घडीला संपूर्ण विश्व हे कोरोनाच्या महामारी च्या संकटामुळे गेल्या 21 दिवसांपासून लॉकडाऊनच्या सक्तीच्या सुट्टी वरच घरामध्ये जणूकाही बसले आहे. काही व्यक्ती या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी असल्यामुळे त्यांना घराबाहेर पडणे गरजेचे आहे, मात्र याव्यतिरिक्त काहीजण घरूनही काम करत आहेत.
आपल्यामधील उपजत कलागुणांचा वापर करून वेगवेगळ्या कलाकृती बनवणे, ऑनलाइन कोर्सेस करून आपल्या आवडीच्या क्षेत्रातील नवीन कौशल्य शिकून घेणे इतकेच नव्हे तर काही जण या वेळेचा सदुपयोग आवश्यक तो आराम मिळवण्यासाठी खूप सारे तास झोपा काढणे मध्येही घालवत आहेत.
वर्षभरामध्ये निरनिराळ्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असलेले बॉलीवूडमधील तारे-तारका सुद्धा घरकाम व आपल्या प्रियजनांना सोबत घालवलेला वेळ यांची छायाचित्रे सोशल मीडियावर वेळोवेळी पोस्ट करत आहेत. बॉलीवूड मधील काही तारकांनी या वेळेचा सदुपयोग इतर वेळी चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे न शिकता आलेल्या मात्र मनापासून या गोष्टी करण्याची व शिकण्याची इच्छा असलेल्या गोष्टींना आत्मसात करण्यामध्ये गुंतवला आहे.
अशीच एक बॉलिवूड तारका जी आपल्या विविधांगी अभिनयामुळे प्रसिद्ध आहे ती म्हणजे ‘भूमी पेडणेकर’ होय. लॉकडाऊनमुळे भूमीसुद्धा सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. इतर वेळी घरी राहण्यासाठी किंवा आपल्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी तितकासा वेळ मिळत नसल्याचे तिने सांगितले.
लाँकडाऊन च्या या काळामध्ये भूमीने आपली कैक दिवसांपासूनची अपूर्ण राहिलेली इच्छा म्हणजे हायड्रोपोनिक अर्थातच जलसंवर्धन शेतीचे तंत्रज्ञान आपली आई सन्मित्र पेडणेकर यांच्या सोबत आत्मसात करत आहे.
भूमी आणि तिच्या आई सुमित्रा पेडणेकर यांना गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या घरातच भाजीपाला देऊ शकणारी एक बाग बनवायची इच्छा होती, मात्र सध्याच्या शहरी संस्कृती मध्ये घरामध्ये बाग बनवणे हे दुरापास्त होऊन बसले आहे.
म्हणूनच जलसंवर्धन शेती हा पर्याय त्यासाठी त्यांना अत्यंत प्रभावशाली असा पर्याय वाटला. सुट्टीच्या निमित्ताने भूमी आणि तिच्या आईने जलसंवर्धन शेतीचे तंत्रज्ञान शिकले आणि घरामध्ये एक बाग विकसित केली .त्याद्वारे त्यांना या भाज्यांची योग्य ती वाढ झाल्यावर आवश्यक त्या सर्व भाज्या बाहेर बाजारात न जाता घरीच मिळू शकणार आहेत व ही एक अचीवमेंट असल्याचा फील येत आहे असे भूमीने सांगितले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ची सर्व नियमावली पाळून आपण जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात या जलसंवर्धन शेतीच्या माध्यमातून राहू शकतो आहे याचा खूप आनंद होत असल्याचे ही भूमी सांगते. हायड्रोपोनिक हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये मातीच्या वापराशिवाय पाण्यामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व अन्नघटक,क्षार,खनिज द्रव्ये पाण्यामध्ये विरघळून शकणाऱ्या मिश्रणा द्वारे पुरवले जातात.
ज्यामधून शेती केली जाते. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान याचा मुख्य फायदा म्हणजे पिकासाठी वापरलेल्या जाणाऱ्या पाण्याची बचत होते जसे की पारंपारिक शेतीमधून एक किलोग्रॅम टोमॅटोचे पीक घेण्यासाठी साधारण चारशे लिटर इतके पाणी वापरावे लागते तर हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करताना एक किलोग्रॅम टोमॅटोसाठी साधारणपणे सत्तर लिटर पाणी लागते.हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे मुख्यत्वे गाजर, लेट्युस, मुळा, टोमॅटो यासारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते.