Big Boss Marathi : ‘घरात कुस्ती बाहेर दोस्ती’ म्हणत तृप्ती देसाई बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या स्पर्धकांसोबत घालवतेय वेळ..? फोटो Viral

बिग बॉसच घर म्हणजे जादुई घर आहे, असं अनेकजण म्हणतात. याच नक्की कारण काय, हे केवळ तेच लोक सांगतात जे त्याचा भाग बनलेले असतात. इंग्लिश, हिंदी, कन्नड, तेलगू किंवा मराठी, भाषा कोणतीही असली तरीही, बिग बॉसचे घर बऱ्याच अंशी सारखेच असते. त्यामध्ये सहभागी झाल्यांनतर, स्पर्धकांना सारख्याच ता’ण-त’णावाचा सामना करावा लागतो.
या घरामध्ये, वेगवेगळ्या भावनांचा अक्षरशः उ’द्रेक होतो. आणि त्यातूनच वा’द, भां’डण हे सगळंच काही वाढत. मात्र, हे वा’द किंवा भांडण केवळ त्या मर्यादित काळापुरते असतात. घराच्या बाहेर आल्यावर जेव्हा पण, स्पर्धक स्वतःचे जुने भाग बघतात अनेकांना आपण असं का व्यक्त झालो याचे आश्चर्य देखील वाटते.
पण बिग बॉस मराठीमध्ये झालेल्या पहिल्याच आठवड्याच्या नॉमिनेशनमध्ये अक्षय वाघमारेला, घराच्या बाहेर पडावं लागलं होत. त्यानंतर तृप्ती आणि सुरेखा दोघी घरात होत्या. मात्र त्या दोघींचे खूप वेगळे नाते या घरात बघायला मिळाले. किचनमध्ये कधी त्या दोघी सोबत जेवण बनवत होत्या तर कधी चांगल्याच वा’दाला पेटत होत्या.
तृप्ती आणि सुरेखामध्ये, बिग बॉसच्या घरात चांगलाच वा’द देखील झाला होता. कॅप्टन्सीच्या टास्क वरुन सुरेखा आणि तृप्ती यांच्यामधील वाद शिगेला पोहोचला होता. अखरेचे दोन दिवस त्या एकमेकींसोबत बोलत देखील नव्हत्या. त्यातच सुरेखा कुडची कमी मत मिळाल्यामुळे घराच्या बाहेर पडल्या, पण जाताना तृप्तीला कॅप्टन बनवून गेल्या.
त्यामुळे त्यांनी जाताना आपल्या मैत्रीची ओळख ठेवली होती. आणि आता तर, घरातील वा’द पूर्ण विसरुन नव्याने सुरुवात केल्याचं बघायला मिळत आहे. अक्षय वाघमारे, तृप्ती देसाई आणि सुरेखा कुडची यांनी सोबत चावडी रंगवली. घराच्या बाहेर आल्यानंतर, सगळेच आपल्या आयुष्यात व्यस्त होतात.
त्याच कामातून वेळ काढत तिघे एकत्र आले आणि काही चांगला वेळ सोबत घालवला. त्याचेच काही फोटोज, अक्षयने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंट वरुन शेअर केले आहेत. काही दिवसांपासून, अक्षय पुन्हा बिग बॉसच्या घरात जाणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.