Bigg Boss 15: नॅशनल टीव्हीवर राखीच्या नवऱ्याने केल्या सर्व हद्द पार; रोमँटिक होत केला सर्वांसमोर LipLock

Bigg Boss 15: नॅशनल टीव्हीवर राखीच्या नवऱ्याने केल्या सर्व हद्द पार; रोमँटिक होत केला सर्वांसमोर LipLock

बिग बॉस १४(Bigg Boss 14 )मध्ये राखी सावंतने पुन्हा एकदा एंट्री घेतली आणि पुन्हा एकदा आपणच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधली ड्रामा क्वीन असल्याच सिद्ध केलं. माघील सीझनमध्ये राखी सावंतने(Rakhi Sawant )आपल्या खास विनोदी शैलीने सगळ्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. त्या सीझनमध्ये सगळीकडे ड्रामा करणाऱ्या राखीच्या आयुष्यातील काही गोष्टींवर प्रकाश पडला.

यावेळी आपल्या मनातील दुःख तिने व्यक्त केले होते. आपले लग्न झाले असून.अजुनपर्यंत तिच्या नवऱ्याने संपूर्ण जगासमोर आपला स्वीकार नाही केला, हे सांगताना राखीच्या डोळ्यातील अश्रुनी सगळ्यांना व्यथित केले होते. त्यावेळी केवळ तिच्या नवऱ्याचे नावच समजले होते. म्हणून तर नक्की राखी सावंतचा रितेश कोण हे जाणून घेण्याची सर्वानाच उत्सुकता होती.

आणि तिच्या याच सवयीमुळे, बिग बॉसच्या घरातच तिचे आणि तिच्या नवऱ्याचे म्हणजेच रितेशचे भांडण देखील बघायला मिळाले. मात्र शुक्रवारी असं काही झालं की, सगळ्यांनाच ते पाहून आश्चर्य वाटले. राखीचा नवरा आणि तिच्यामधल्या रोमान्सने आता जबरदस्त चर्चा रंगवली आहे. शुक्रवारी सकाळी सकाळीच राखीचा नवरा म्हणजेच रितेश चांगलाच रोमँटिक झाला.

आणि बिग बॉसमधल्या सगळ्या घरच्यांसमोर तिला लिप किस केलं.विशेष म्हणजे नवऱ्याच्या या कृतीमुळे राखी सावंतला पहिल्यांदाच सर्वानी लाजताना पहिले. तिची प्रतिक्रिया अगदी बघण्यासारखी होती. रितेश-राखीमधल्या या लवी-डवी मुमेंटचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. या एपिसोडमध्ये घरातील सर्व सदस्य गार्डनच्या भागात बसलेले होते.

तिथेच राखी सावंत तिच्या नवऱ्याबरोबर अगदी रोमँटिक पोजमधे उभी होती. त्या दोघांना असं उभं असलेलं बघून घरातल्या सर्वच सदस्यांनी ‘Kiss kiss kiss ’ असं जोरात ओरडायला सुरुवात केली. आणि त्यानंतर रितेशनं खरोखर आपल्या बायकोचा म्हणजेच राखीचा लीप-लॉक किस घेतला त्यामुळे बिग बॉसचे सगळे फॅन्स देखील चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत.

राखी आणि रितेश एकमेकांच्या जवळ आले आणि रितेशनने देखील अगदी फिल्मी स्टाईलमध्ये राखीला बिनधास्तपणे सगळ्यांसमोर लिप्सवर किस केलं. त्यांचा हा रोमान्स बघून घरातील सगळ्याच जणांनी एकच कल्लोळ केला. नॅशनल टेलिव्हीजनवर, आपल्या नवऱ्यानं सगळ्यांसोमर प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेल्या या रोमान्समुळे राखीसारखी बोल्ड मुलगी सुद्धा चक्क लाजून लाजून लाल झाल्याची बघायला मिळाली.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *