पिळदार बॉडीच्या बाबतीत ऋतिक, सलमान आणि टायगर श्रॉफला देखील मात देतो ‘हा’ मराठमोळा अभिनेता

पिळदार बॉडीच्या बाबतीत ऋतिक, सलमान आणि टायगर श्रॉफला देखील मात देतो ‘हा’ मराठमोळा अभिनेता

बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची गरज असते. त्यामुळेच बॉडी बिल्डिंग हा एक प्रकार समजला जातो. सुरुवातीला सलमान खानने आपले बॉडी प्रदर्शन करून एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

सलमान खान त्याच्या प्रत्येक चित्रपटात अंगप्रदर्शन करत असतो. त्याचबरोबर ऋतिक रोशन यांनीदेखील उत्तम प्रकारे बॉडी डेव्हलप करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फिटनेसच्या बाबतीत ऋतिक रोशन सर्वांनाच मागे टाकतो. ऋतिक रोशनच्या पावलावर पाऊल ठेवत टायगर श्रॉफदेखील उत्तम शरीरसौष्ठ असलेला अभिनेता आहे.

त्याने देखील खूप मेहनत घेऊन आपली उत्तम बॉडी बनवलेली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? बॉलिवूडमध्ये आज पर्यंत जेवढे बॉडी बिल्डर झाले आहेत त्यांच्यापैकी या मराठमोळ्या बॉडी बिल्डरच्या आसपास देखील कोणी फिरकत नाही.

बॉडीबिल्डर होण्यासाठी आपल्याला एक चांगला स्टार किंवा ब्लॉकबस्टर अभिनेता असणे आवश्यक नाही. आज आम्ही तुम्हाला अशा बॉडीबिल्डर बद्दल सांगणार आहोत जो सलमान, हृतिक, टायगर सारख्या कलाकारांना शरीराच्या बाबतीत विशेष स्पर्धाच देत तर ते कलाकार या बॉडीबिल्डर आसपास देखील फिरकत नाही.

तर मित्रांनो, तुम्हालादेखील त्या बॉडीबिल्डरची फोटो आणि त्या बॉडीबिल्डरचे नाव जाणून घ्यायचे असेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

संग्राम चौगुले असे या अभिनेत्याचे आणि बॉडीबिल्डरचे नाव आहे, जो आपल्या शरीरासाठी प्रसिद्ध आहे. 2014 साली, शरीराच्या सौष्ठ स्पर्धेत त्याने मिस्टर वर्ल्डचे जेतेपदही जिंकले. आतापर्यंत त्यांना बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही, परंतु आता संग्रामला मराठी भाषेतील काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.

विशेष बाब म्हणजे संग्राम चौगुले यांनी कुठलेही सप्लीमेंट न घेता आपली बॉडी बनवली आहे. संग्राम चौगुले अहमदनगर येथील एका शेतकरी कुटुंबातील आहे. पण आज ते त्यांची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या शिखरावर पोहचले आहेत. महाराष्ट्रातील लाखो तरुण त्यांना आपले आयडल मानतात.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *