या चॉकलेट बॉयने स्वत:च संपवले स्वत:चे करिअर, आता पाहून बसेल धक्का!!

या चॉकलेट बॉयने स्वत:च संपवले स्वत:चे करिअर, आता पाहून बसेल धक्का!!

कुमार गौरव एकेकाळी बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून विख्यात होता. त्याने त्याचा चित्रपट डेब्यु ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून केला. पण आता या चॉकलेट बॉयला ओळखणेही कठीण झाले आहे. हा चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता कुमार गौरव.

1981 मध्ये ज्या लव्ह स्टोरी चित्रपटातून कुमार गौरवने पदार्पण केले होते तो चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. म्हणायचं झालं तर कुमार गौरवचे नशीब की त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला.

पण यश ही अशी गोष्ट आहे ती जर पचवता आली तर माणूस यशाच्या शिखरावर पोहचतो पण जर यश पचवता आले नाही तर त्याचा नायनाटही होतो. असेच काहीसे कुमार सोबत झाले आणि मिळालेली प्रचंड यश त्याला पचवता आले नाही आणि प्रसिद्धी ची हवा त्याच्या डोक्यात गेली.

जेव्हा चित्रपट पदार्पण केले तेव्हा गौरव देखील नवखा होता पण त्याचा पहिला चित्रपट हिट झाला आणि त्याला प्रसिद्धी मिळाल्यामुळे तो नवीन अभिनेत्रींनसोबत काम करण्यासाठी नकार देत राहिला. त्यापैकी एक म्हणजे मंदाकिनी.

कुमार गौरव हा सुपरस्टार राजेंद्र कुमार यांचा मुलगा. अन्य वडिलांप्रमाणे राजेंद्र कुमार यांनीही मुलाचे करिअर वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत. माधुरी दीक्षितला घेऊन ‘फूल’ हा चित्रपट त्यांनी काढला. पण तोही सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर कुमार गौरवने तेरी कसम, आॅल राऊंडर, जानम, गूंज, सियासत अशा अनेक चित्रपटांत काम केले, पण त्याला यश मिळाले नाही.

पुढे फिल्म इंडस्ट्रीत जम बसणार नाही, हे कुमार गौरवला कळून चुकले आणि त्याने बिझनेस करायचे ठरवले. सध्या तो मालदीवमध्ये ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करतो. त्याचा कन्सट्रक्शनचाही बिझनेस आहे.

1984 मध्ये कुमार गौरवने सुनील दत्त यांची मुलगी आणि संजय दत्तची बहीण नम्रता दत्त हिच्यासोबत लग्न केले. दोघांनाही साची आणि सिया अशा दोन मुली आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.