CDS Bipin Rawat : अपघात कि षडयंत्र? फुलप्रूफ प्रोटोकॉल, MI-17V5: विंग कमांडर पृथ्वीसिंह पायलट असूनही कसे धडकले हेलिकॉप्टर?

CDS Bipin Rawat : अपघात कि षडयंत्र? फुलप्रूफ प्रोटोकॉल, MI-17V5: विंग कमांडर पृथ्वीसिंह पायलट असूनही कसे धडकले हेलिकॉप्टर?

कालपासून संपूर्ण देशभरात दुःखाचे वातावरण आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात CDS bipin rawat यांच्या निधनाच्या बातमीने सगळीकडे शोक पसरला आहे. त्यांच्या निधनाची बातमी जितकी जास्त दुःखद आहे, तेवढीच मोठी धक्कादायक देखील आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे, देशाच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सीडीएसची सुरक्षा अतिशय खास आणि कडक प्रोटोकॉल मध्ये हाताळण्यात येत असते.

Bipin Rawat यांच्यासोबत नेहमीच अनेक सक्षम कमांडो असतात. देशातील सर्वात फुलप्रूफ विमानाने ते प्रवास करत असत. आणि असे असताना देखील त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश(crash) कसे होऊ शकते, यावर आता मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दुर्घटनेमध्ये Bipin Rawat त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य वरिष्ठ सैन्य अधिकारी देखील होते. ज्यामध्ये विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान हे हेलिकॉप्टरचे पायलेट होते.

या प्रोटोकॉल्सच्या अनुषंगाने एक सोबत 2 हेलिकॉप्टर उडान घेणे अत्यावश्यक असते. ज्या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस सारखे अधिकारी किंवा इतर म्हणत्वाचे व्यक्ती असतात, ते हेलिकॉप्टर डबल इंजिनवाले असणे महत्त्वाचे असते. ज्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला ते देखील डबल इंजिन वालेच होते. तामिळनाडूच्या कुन्नूर येथील, ज्या परिसरात हा अपघात झाला तिथे घनदाट जंगल असल्यामुळे कमीत कमी विजिबिलिटी होती आणि म्हणूनच हा अपघात झाला, अशी शंका उत्पन्न केली जात आहे.

सोबतच ज्यावेळी हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले त्यावेळी वातावरण खराब होते. म्हणून देखील हा अपघात घडला असावा, असे सांगितले जात आहे. ज्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची पूर्णपणे तपासणी होईल, तेव्हाच या हेलिकॉप्टर क्रॅशबद्दलची खरी माहिती समोर येईल. तोपर्यंत बिपिन रावत यांचा मृत्यू मागील खरे कारण एक रहस्यच बनून राहणार आहे.

सत्य सर्वसामान्यांच्या समोर येईल का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. परंतु उत्तम प्रोटोकॉल, आधुनिक वैज्ञानिक यंत्रणेने परिपूर्ण असे सुसज्ज हेलिकॉप्टर आणि सक्षम विंग कमांडर पायलट असताना देखील झालेला हेलिकॉप्टर क्रॅश अपघात आहे की षडयंत्र या प्रश्नाने भारतीयांच्या मनात घर केले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *