सावधान ! चायनीज फूड खाताय ? तर हे नक्की वाचा नाहीतर….

आपल्या देशात चायनिज फूड ठिकठिकाणी उपलब्ध होते. अनेकजण जायनिजच्या हातगाड्या, हॉटेल्समध्ये रस्त्यावर, चौकात किंवा अतियश वर्दळ च्या ठिकाणी लावतात आणि आपण त्या पदार्थांवर ताव मारतात. भारतातीळ चायनीज फूड हे खूप मसालेदार असते.
चायनीज फूडमध्ये जे पदार्थ टाकले जातात,ते वारंवार खाण्यात आल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकते. चायनीज फूड सोडियम ग्लुटामेट किंवा एमएसजी म्हणजेच सामान्य भाषेत अजिनोमोटो ज्यास म्हटले जाते ते टाकण्यात येते.ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असते.
चायनिज फूडमध्ये जास्त मीठ टाकले जाते. भारतीय पदार्थांच्या तुलनेत यात ४० टक्के जास्त सोडियम असल्याने रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना ते हानिकारक आहे.चायनीज फूड्समध्ये मैद्याचे नूडल्स आणि तांदुळाचा जास्त वापर होतो.
मोमोजसारखे काही चायनिज पदार्थ वाफेवर तयार केले जातात. हे कमी कॅलरीचे असल्याने खाता येतील. चायनीज पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरी अधिक असल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे हे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. रस्त्याच्या बाजूला विकल्या जाणाऱ्या चायनीज फूडमध्ये हल्क्या दर्जाचे सॉस आणि इतर पदार्थ वापरले जात असल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.